रिपाई (आठवले) अतिक्रमण धारकांच्या पाठिशी :- प्रशांत मुन

0
23
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धा.रेल्वे ता.प्रतिनीधी – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार मा. रामदास आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली धामणगाव रेल्वे मतदार संघात पक्षाची वाटचाल मोठ्या जोमाने सुरू असुन धामणगाव रेल्वे तालुक्यातील व जिल्ह्यातील प्रलंबित सामाजिक समस्या व तालुक्यातील अतिक्रमण धारकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी रिपाइं संपूर्ण ताकदीनिशी अतिक्रमण धारकांच्या पाठिशी उभी राहणार असल्याची ग्वाही रिपाई आठवले चे अमरावती जिल्हा संघटक प्रशांत मुन यांनी आज धामणगाव रेल्वे तहसील कार्यालय वर धरणे आंदोलनात दिली
सोमवारला धामणगाव रेल्वे तहसील कार्यालय वर अतिक्रमण धारकांना २०११ प्रयत्न च्या सरकारी नियमाप्रमाणे त्यानं आठ अ व घरकुल योजना मिळाली पाहिजे.सनमानिय तहसीलदार विर साहेब यांना निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात धिरज भैसारे युवक आघाडी शहर अध्यक्ष. राजिक बेग अल्पसंख्याक अध्यक्ष. डॉ पवन झटाले शहर अध्यक्ष. स्नेहल वानखडे . कु. संजिवनी पचारे. आकाश मुन . मनिष शेलारे.यांनी आपली भूमिका मांडली.
धरणे आंदोलनाचे सुत्र संचालन रवि उर्फ दादू मेश्राम तालुका संघटक रिपाई आठवले यांनी केले तर आभार तालुका अध्यक्ष विनायक ढाणके यांनी केले या आंदोलना मध्येप्रामुख्याने राजु सावध आदित्य शंभरकर. दिनेश बोबडे. रंजना रोकडे.अंकुश भैसारे. प्रविण भैसारे. सुनिता भैसारे.मुन्ना खान.सुल्लतानखा.सदानंद कांबळे सह शोकडो महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते

veer nayak

Google Ad