आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : मोरांगणा (खरांगणा) जिल्हा वर्धा येथील मातंग समाजातील परिवाराचे 25 वर्षापासून BPL नंबर रद्द करून त्यांना शासकीय योजने पासून वंचित केल्याने चौकशी करून कारवाई करण्यात यावी असे निवेदण समाज भुषण तथा राष्ट्रीय लहू शक्ती चे सरचिटणीस राजेश अहीव यांचे नेतृत्वात तहसीलदार तथा गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना देण्यात आले.
तहीलदार श्री. हरिषजी काळे यांना निवेदन देताना सांगितले की,वर्धा जिल्ह्यातील मोरांगना (खारांगणा) येथील अनुसूचित जातीतील मातंग समाजाच्या 15 ते 25 लोकांना शासनाच्या सर्व्हेक्षना नुसार गेल्या 25 वर्षा पूर्वी पासुन BPL दारिद्र्य रेषेखाली असल्याचे प्रमाणपत्र बहाल करून त्यांना संबंधित विभागाने जाहीर केले
त्या नंतर काही काळ त्यांना शासनाच्या सोई सुविधा उपलब्ध झाल्या,नंतर गेल्या 1995 -1996 पासून त्यांना अचानक कोणतीही तक्रार,सूचना नसताना त्यांचे BPL कार्ड रद्द करून त्यांना गेल्या 25 वर्षापासून शासनाच्या वैद्यकीय,आर्थिक,सामाजिक, राजकीय योजना व संधी पासून वंचित केल्या गेले BPL नंबर नसल्याने अनेकांना आर्थिक परिस्थितीने वैद्कीयदृष्ट्या जीव गमावावा लागला शासनाच्या प्रथम BPL सर्व्हेक्षण नुसार प्राप्त लाभार्थ्यांना कोणत्या नियमानुसार अप्राप्त ठरऊन त्यांना शासनाच्या योजने पासून वंचित केले या बाबत संबंधित समाज बांधव सदर ग्राम पंचायत,पंचायत समिती यांना सतत विचारणा करत असताना त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन टाईम पास करण्याचा प्रयत्न करत असल्याचे तसेच ,35 किलो धान्य देय्य असताना 15 किलो धान्य मिळत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. सदर उपेक्षित मातंग समाजाच्या सामाजिक,आर्थिक,विकासाच्या प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्या संबंधित कर्मचारी,अधिकारी,लोक प्रतिनिधी यांची सखोल चौकशी करून वंचित मातंग समाजाला न्याय मिळवून द्यावा असे निवेदन राजेश अहीव ,उपाध्यक्ष सुधाकर वाघमारे, खरांगना सर्कल प्रमुख हरीचंद्र वानखेडे यांनी ,सर्वश्री बबन वानखेडे,पुंडलिक वानखेडे,दिवाकर,अशोक वानखेडे,वामन कासारे,राजू ढोके,कमला बाई वानखेडे, ननिबाई वानखेडे,सुरेंद्र,महेंद्र,प्रकाश,मनोज,रवींद्र,रमेश वानखेडे यांच्या उपस्थित निवेदन देण्यात आले.