एसओएस कब्स आणि प्राथमिकमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

0
55
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे

श्री दत्ता जी मेघे बाल कल्याण शैक्षणिक संस्था द्वारा संचालित स्कुल ऑफ स्कॉलर्स कब्स व प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून धामणगाव रेल्वेचे कॅप्टन अशोक महाजन सर होते. सरस्वती, महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.उपस्थित सर्वांनी राष्ट्रध्वजाला वंदन केले व राष्ट्रगीत म्हटले. यावेळी प्रमुख पाहुण्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका साई नीरजा यांच्या हस्ते ग्रीटिंग कार्ड व रोप देऊन स्वागत करण्यात आले. संगीत शिक्षक गौरव देवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता पाचवी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर देशभक्तीपर गीते गाऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले.

यावेळी प्राचार्य के.साई नीरजा व प्रमुख पाहुणे कॅप्टन अशोक महाजन सर यांनी उपस्थित सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व सर्वांना संबोधित करताना प्रजासत्ताक दिनाचे महत्व आपल्या दमदार भाषणात मांडले. नृत्य शिक्षक सचिन उईके यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता तीसरी, चौथी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर देशभक्तीपर नृत्य सादर करून उपस्थित सर्वांना मंत्रमुग्ध केले. सर्व पालक आणि विद्यार्थ्यांसाठी पारंपारिक पोशाख वॉकचा एक भव्य कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये सर्व पालक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. विविध राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडवत पारंपारिक पोशाखात विविध राज्यांचे पोशाख परिधान करून त्यांनी ट्रॅडिशनल अटायर वॉक करून उपस्थित सर्वांना मंत्रमुग्ध केले, जे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीच्या विद्यार्थीनी अभंगा लंगरे, चंचल मानकानी, आराध्या डाफे, अक्षरा दाते यांनी केले. शाळेच्या मुख्याध्यापिका के.साई नीरजा व पर्यवेक्षिका शबाना खान यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्लू हाऊसचे सर्व सदस्य व आयोजन समिती, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी केला.

veer nayak

Google Ad