||पनोरा येथे खरीप हंगाम पूर्व सोयाबीन उगवण क्षमता प्रात्यक्षिके सादर||

0
47
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

खरीप हंगाम 2024 सुरू होणार असताना शेतकऱ्यांकरिता सदर हंगाम सुकर जाण्याकरिता व पेरणी 100 %यशस्वी होण्याकरिता कृषी विभागातील कृषी सहायक यांनी कंबर कसली असून शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांना सोयाबीन उगवण क्षमता प्रात्यक्षिके करून दाखवण्यात येत आहेत.

मौजा पनोरा येथील श्री सुधीर देविदास टोळे व इतर शेतकऱ्यांची सोयाबीन उगवण क्षमता प्रात्यक्षिके गावातील कृषी सहायक श्री जी एस काळपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सदर प्रात्यक्षिकाचा प्रमुख उद्देश म्हणजे आपले घरगुती बियाणे पेरणी लायक आहे की नाही याची खात्री करून घेणे संबंधित बियाण्याची उगवण क्षमता 70 टक्के असल्यास सदर बियाणे पेरणी योग्य आहे असे समजले जाते.त्याच प्रकारे 70% च्या कमी आढळल्यास प्रति टक्का अर्धा किलो बियाणे वाढवून घरगुती सोयाबीन बियाणे आपल्याला पेरणीसाठी वापरता येते .त्यामुळे बाजारपेठे मधील महागडी बियाण्याची बॅग ऐवजी घरगुती बियाणे वापरल्यास शेतकऱ्यांची पैशाची बचत होते. सोबतच गावांमधेच शेतकऱ्यांना सदर बियाणे उपलब्ध होते. सोयाबीन बियाण्याचे टरफल हे नाजूक असल्या कारणामुळे सर्व शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाण्याची आपल्या घरीच गोणपाटावर उगवण क्षमता प्रात्यक्षिके करूनच शेतामध्ये संबंधित बियाण्याची पेरणी करावी.असे आव्हान गावांमधील कृषी सहायक श्री जी एस काळपांडे यांनी शेतकऱ्यांना केलेले आहे.

veer nayak

Google Ad