चांदुर रेल्वे
२०२३ मध्ये निंभा येथे स्थापन झालेले स्व. नरहरी शे. देशमुख सार्वजनिक वाचनालय हे चांदुर रेल्वे शहराच्या शैक्षणिक इतिहासातील दीपस्तंभ असून कोणतेही वाचनालय हे समाजातील प्रत्येक घटकांना सर्वांगीण बुद्धिमत्ता प्रदान करणारे दालन ठरते, असे भावपूर्ण प्रतिपादन स्थानिक निंभा येथील सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रमोद इंगळे तथा वाचनालयाचे अध्यक्ष यांनी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष पदावरून बोलताना केले.
30 जानेवारी 2024 ला महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमात प्रमुख व्यक्ते श्री देवराव खोब्रागडे आपल्या अभ्यासपूर्वकथा ओजस्वी वाणीतून प्रभावी भाष्य करी वाचनालयाचे महत्त्व विशद करून मंत्रमुक्त केले . याप्रसंगी मंचावर वाचनालयाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते .यावेळी गजानन देशमुख यांनी म्हटले तळागाळातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या प्रवाहात आणून त्यांची भविष्य उज्वल करणारे प्रमोद इंगळे हे गावातील एकमेव व्यक्ती आहे .
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर मध्ये गजानन देशमुख , शरद देशमुख ,अरुणराव देशमुख , विलासराव देशमुख ,मुन्ना झाडे , दीपकराव झाडे ,दिलीप देशमुख ,उद्धवराव देशमुख ,आर.बी. देशमुख ,रणजीत चव्हाण ,सिद्धार्थ पारवे, उत्तमराव वासनीक ,ऋषिकेश देशमुख ,संदीप देशमुख ,तुर्काने ,गणेश देशमुख ,अशोकराव देशमुख ,दिवाकर जाधव ,हसंता धनीस्कार ,शत्रुघ्न सहारे ,देवराव खोब्रागडे ,विजय देशमुख ,सतीश देशमुख ,गजानन देशमुख ,मिलिंद देशमुख दीलेश ज्ञानेश्वर देशमुख गजानन श्रीरामे व गावातील मंडळी हजर होती