शुक्रवारी सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी धामणगावच्या रेल्वे स्टेशनला सेंट्रल रेल्वेचे महाप्रबंधक रामलखन यादव यांनी निरीक्षणाकरिता भेट दिली या प्रसंगी स्टेशनला नववधू प्रमाणे सजविण्यात आले होते 

0
122
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे,

अत्यंत सुंदर आणि स्वच्छ वातावरणात एका तासाचे भेटीमध्ये यादव यांनी धामणगाव रेल्वे स्थानकाच्या आरपीएफ च्या नूतन इमारतीसह अन्य नियोजित बांधकाम मालधक्का पार्किंग स्वच्छतागृह तसेच स्टेशनवर अनेकांशी हितगुज करून निरीक्षण केले यावेळी त्यांच्यासोबत डीआरएम मनीष अगरवाल वाणिज्य प्रबंधक आशुतोष श्रीवास्तव सह धामणगाव चे रेल्वे प्रबंधक मुदलियार रेल्वे सुरक्षा बल ठाणेदार छेदीलाल कनोजिया, सिनियर वाणिज्य निरीक्षक टी जी पुष्पलवार वाणिज्य परिवेक्षक अश्विन जयस्वाल, मालधक्का परिवेक्षक मनोज पाटील सह शंभरच्या वर अधिकारी कर्मचारी व सुरक्षा बल होते उपरोक्त प्रसंगी महाप्रबंधक यादव यांच्या भेटण्याची उत्सुकता धामणगाव शहरातील अनेक सामाजिक संघटना व नागरिकांना होती या अनुषंगाने महाप्रबंधक यादव यांची रेल्वेच्या सर्व समस्यांचे निवेदन घेऊन टिमटाला स्टेशन व धामणगावच्या रेल्वे स्टेशनवर निमंत्रित असलेले आमदार प्रताप अडसड यांनी धामणगाव रेल्वे सल्लागार समितीचे कमल छांगाणी,अर्चना राऊत,दिनेश मुंदडा,दिनेश बोबडे,सुनिल साकुरे यांनी सर्वप्रथम भेट घेतली आमदार अडसड यांनी याप्रसंगी महाप्रबंधक यादव यांना श्रीराम परिवाराची प्रतिमा भेट दिली ही भेट यादव यांनी प्रसन्नतेने स्वीकारली

महाप्रबंधक यादव सकारात्मक….. अडसड

आमदार प्रताप अडसड यांनी महाप्रबंधक यादव यांची टिमटला आणि धामणगाव रेल्वे स्टेशनवर वैयक्तिक भेट घेतल्यानंतर आणि नागरिकांनी तसेच स्वतः दिलेल्या निवेदनाबद्दल चर्चा केल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात आमदार अडसड म्हणाले की, टिमटाला, धामणगाव व  तळणी रेल्वे पर्यंत ज्या ज्या नागरिकांनी आणि संघटनांनी तसेच मी वैयक्तिकरित्या दिलेल्या निवेदना बाबत यादव यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सर्वांच्या निवेदनाबाबत सकारात्मक आणि समाधानकारक उत्तर दिलेत तसेच या निवेदनाबाबत पुढेही दिल्ली येथे वैयक्तिक चर्चा करू असेही यादव म्हणाले

—————————————————

स्टेशननंतर धामणगाव येथे विशेष गाडीने आगमन झालेल्या महाप्रबंधक यादव यांनी उपस्थित सर्वांचे मागण्यांबाबतचे निवेदन स्वीकारले याप्रसंगी चांदुर रेल्वेच्या सल्लागार समितीने व रे रोको समितीने सुद्धा निवेदन सादर केले सल्लागार समिती व वेगवेगळ्या संघटने दिलेल्या निवेदनानुसार सध्या अमर शहीद भगतसिंग चौक येथील रेल्वे स्टेशनचे दक्षिण भागातील मुख्य रेल्वे द्वार अमृत भारत योजनेअंतर्गत बंद होऊ नये धामणगाव रेल्वे स्टेशनवर राजस्थान जाणाऱ्या व येणाऱ्या गाडीचा थांबा कोरोनाच्या पूर्वी सुरू असलेली पॅसेंजर गाडी चा थांबा तसेच गीतांजली एक्सप्रेस धामणगाव रेल्वे स्टेशनवर थांबविण्यात यावी गुड शेडमध्ये सुविधांचा अभाव असल्यामुळे त्या ठिकाणी उपाययोजना करण्यात याव्यात धामणगाव चे रेल्वे पार्सल पूर्ववत (चालू )करण्यात यावे यासह चांदुर रेल्वे येथील समिती दिलेल्या निवेदनात चांदुर रेल्वे स्टेशनवर कोरोनाच्या आधी जबलपूर एक्सप्रेस आणि शालिमार एक्सप्रेस चा थांबा होता तो पूर्ववत करण्यात यावा अशी प्रमुख मागणी केली चांदुर रेल्वे स्टेशन  वर इंडिकेटर लावण्यात यावे शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात यावी तसेच चांदुर रेल्वेच्या शेवट शिवाजीनगर येथील पुलाचे बांधकाम जलद गतीने करण्यात यावे तळणी रेल्वेचे सरपंच सचिन बामनोटे यांनी सुद्धा तळणीच्या स्टेशन बाबत निवेदन दिले धामणगावच्या रेल्वे स्टेशनवर या माजी आमदार प्रा.वीरेंद्र जगताप,लॉयन डॉ. पवन शर्मा, गोपाल भूत राजस्थानी हितकारक मंडळचे अध्यक्ष अशोक मूंधड़ा, सचिव लक्ष्मीनारायण चांडक, कोषाध्यक्ष संजय जांगडा, लक्ष्मीनारायण वर्मा, स्वामी समर्थ जेष्ठ नागरिक संघाचे गुणवंत सावलकर, शंकरराव कुर्वे, चांदुर रेल्वेचे सल्लागार समिती सदस्य डॉक्टर वसंत खंडार, प्रसन्न चौधरी, निळकंठ सोरगीवकर, बच्चू वानरे विजय मिसाळ, हे लोक समितीचे अध्यक्ष नितीन गवळी, त्याच प्रमाणे लॉयंस क्लब दाता, केट(एआयजेजीएफ), चांदूर रेल्वे व तळनी येथील प्रवाशांनी निवेदने दिली

veer nayak

Google Ad