रामगाव – रस्ता दुरुस्ती बाबत तहसीलदार यांना निवेदन

0
8
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

हिरापुर परिसरातील नागरिकांच्या वतीने युवक व ग्रामस्थांनी एकत्र येऊन दिनांक 10 सप्टेंबर 2023 रोजी तहसील कार्यालय, धामणगाव रेल्वे येथे तहसीलदार साहेबांना निवेदन सादर केले.

धामणगाव ते रामगाव हा मुख्य रस्ता अत्यंत जीर्ण अवस्थेत असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. क्षमतेपेक्षा अधिक अवजड वाहतूक सुरू असल्याने रस्त्याची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. दररोज या मार्गावरून शालेय विद्यार्थी, शेतकरी व सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर प्रवास करत असल्यामुळे त्यांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

निवेदनाद्वारे नागरिकांनी तात्काळ रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्याची मागणी केली आहे. तसेच अवजड वाहनांची रहदारी दुसऱ्या मार्गावर वळवावी, अन्यथा लवकरच तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही तहसीलदारांना देण्यात आला आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व गिरीष गावंडे यांनी केले. त्यांच्या सोबत आदेश भोयर, सौरभ बागडे, अल्पेश बनसोड, अतुल ठाकरे, ओम बोकडे, यश राऊत, संकेत दरणे आदी युवकांनी उपस्थित राहून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

veer nayak

Google Ad