चांदुर रेल्वे-
येथूनच जवळ असलेल्या मांजरखेड (क) येथील चतुराजी बहुउद्देशीय शिक्षण संस्था प्रमुख भगवान इंगळे यांचा नुकताच मातोश्री रमाबाई आंबेडकर जयंती निमित्त शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर उपस्थित पाहुणे मंडळींचा सत्कार करण्यात आला. सत्कार ला उत्तर देताना ते म्हणाले — रमाबाई आंबेडकर यांचे कार्य वाखान्या सारखे होते . त्यांचा जन्म 7 फेब्रुवारी १८९८ वणदगाव येथे झाला व त्यांचा मृत्यू 27 मे 1935 राजगृह दादर मुंबई येथे झाला. बालपणीचा आई वडिलांचे छत्र हरपलेल्या त्या रमाई आंबेडकर , धारवाड्या उपाशी विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी स्वतःच्या बांगड्या (सोन्याच्या ) दिल्या तेव्हापासून लोक त्यांना रमाई म्हणू लागले .शेवटी मी एवढाच म्हणेल “आयुष्यभर कष्ट जीच्या वाट्याला आले”. तसेच यावेळी पू. संत गाडगेबाबा विद्यालयात लेझीम पथक सुद्धा हजर होते.