वाठोडा बु. — ग्रामपंचायत कार्यालय वाठोडा बु. येथे राजमाता जिजाऊ जयंती तसेच स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे विधीवत फोटो पूजन करण्यात आले.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मा. कडूसर सर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर प्रकाश टाकत, “स्वामी विवेकानंदांचे विचार प्रत्येक तरुणाला नवऊर्जा, आत्मविश्वास व देशसेवेची प्रेरणा देतात,” असे प्रतिपादन केले.
हा कार्यक्रम ग्राम बाल संरक्षण समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री सचिनजी आसोडे उपस्थित होते. कार्यक्रमास समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी ग्रामसेवक श्री खरात साहेब, पोलीस पाटील, किशोर सावंत, माजी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष श्री सुनिलजी सावंत, ग्रामपंचायत सदस्य श्री अरुणभाऊ गरड, श्री संजयजी उडाखे ग्रामपंचायत सदस्य निखिल कोरडे, श्री गजानन जाधव, उडाखे, आंगणवाडी सेविका कु. रामटेके, बचतगट महिला डंबळे ताई, गावंडे ताई, सालपेताई, सौ. शेळकेताई, आंगणवाडी मदतनीस रेखाताई तसेच गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमातून युवकांना सामाजिक बांधिलकी, राष्ट्रभक्ती व सकारात्मक विचारांची प्रेरणा मिळाल्याचे उपस्थितांनी सांगितले.
















