धामणगाव रेल्वे,
राजस्थान रामदेवरा रुणीचा चे बाबा रामदेवजी कुलदेवता नाही ते तर वह तो संपूर्ण जगातील मानणाऱ्या प्रत्येकाचे लोक देवता आहेत असे उद्बोधन आपल्या कथेच्या माध्यमातून जगप्रसिद्ध कथा वाचक कलकत्ता येथील संत जयप्रकाश महाराज यांनी धामणगाव येथे व्यक्त केले ते श्री परशुराम महिला सेवा समिती व श्री परशुराम सेवा समिती यांच्या वतीने येथे आयोजित द्वारकाधीश अवतारी भगवान श्री रामदेव जी महाराजांच्या संगीतमय अमृत कथा महोत्सव प्रसंगी बाबांचा जन्मोत्सव प्रसंगी दुसरे पुष्प अर्पण करताना उद्बोधन करीत होते ते म्हणाले की, प्रत्येक मानवाची वाणी ही बाण नसून विना आहे वाणीचा उपयोग संतांच्या माध्यमातून ईश्वर प्राप्तीसाठी करावा कथा ऐकण्यापेक्षा ग्रहण करणे अधिक महत्त्वाचे आहे माणसाने मंदिर माता-पिता गुरु यांच्या नेहमी चरणी असावे धर्मावर चालावे कठीण आहे परंतु सरते शेवटी धर्माच्या मार्गाने चालणे हाच जीवनाचा सर्वर्थ निघतो
येथे रामदेव बाबा यांच्या जीवनावरील अमृत कथा महोत्सवाचे आयोजन दिनांक आज रविवार २७ जुलै पर्यंत करण्यात आलेले आहे करण्यात आलेले आहे
कथा वाचन कोलकाता येथील संत जयप्रकाश महाराज यांच्या वाणीतून होणार होत आहे. दररोज दुपारी २ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आरोही रिसोर्ट, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हा कार्यक्रम सुरू आहे कथेमध्ये आज तिसऱ्या व शेवटच्या दिवशी बाबांचा ब्यावला होणार आहे.आजच्या अमृत कथेमध्ये रामदेव बाबांच्या बाल भूमिकेत वेदांग
गौरव देवघरे तसेच अजमलजी राणी मेणा दे च्या भूमिकेत प्रसिद्ध गायक दिनेश शर्मा व सौ. चंचल शर्मा यांनी भूमिका निभावली
धामणगाव पहिल्यांदाच होणाऱ्या या श्री रामदेव बाबांच्या भव्य कथा आयोजनामध्ये कथा श्रवण करण्याची विनंती श्री परशुराम महिला सेवा समिती व श्री परशुराम सेवा समिती यांनी केलेली आहे