चांदूर रेल्वेत १७ फेब्रुवारीला रेल रोको महाआंदोलन रेल रोको कृती समितीच्या बैठकीतून निर्णय जबलपूर एक्सप्रेस आणि शालिमार एक्सप्रेसच्या थांब्याची मागणी आंदोलनापुर्वी चांदूर शहर होणार बंद

0
13
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदूर रेल्वे – (ता. प्र.)

जबलपूर एक्सप्रेस आणि शालिमार एक्सप्रेस या दोन रेल्वे गाड्यांच्या थांब्याच्या मागणीसाठी आता रेल रोको कृती समितीच्या माध्यमातून रेल रोको महाआंदोलन १७ फेब्रुवारीला चांदूर रेल्वे शहरात होणार असल्याचा निर्णय शनिवारी सायंकाळी जुनी स्टेट बँक येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीतून घेण्यात आला. यादिवशी चांदूर रेल्वे शहर बंद ठेवण्याचे सुध्दा आवाहन करण्यात येणार असुन ही लढाई आर या पार ची असल्याचे रेल रोको कृती समितीने म्हटले आहे.

रेल रोको कृती समितीची बैठक सर्व पक्ष, संघटना, मंडळे व नागरिकांच्या उपस्थितीत व व्यापारी संघटनेचे पदाधिकारी मदन कोठारी यांच्या अध्यक्षतेत पार पडली. या बैठकीच्या चर्चेनुसार, चांदूर स्थानकावर कोरोनापूर्वी थांबणाऱ्या रेल्वे गाड्यांपैकी जबलपूर एक्स्प्रेस (१२१५९/१२१६०) आणि शालिमार एक्स्प्रेस (१८०२९/१८०३०) या दोन गाड्यांचा थांबा कोरोनानंतर रद्द करण्यात आला. त्यामुळे चांदूर रेल्वे सह आजुबाजुच्या तालुक्यातील लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच विद्यार्थी, महिला व व्यापारी वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासंबंधी रेल्वे मंत्रालय, डीआरएम कार्यालय, रेल्वे महाव्यवस्थापकांना २ वर्षांपासून वारंवार निवेदन देऊनही न्याय मिळाला नाही. शालिमार एक्स्प्रेस ​​या गाडीला चांदूर स्थानकावर ३०-३५ वर्षांपासून थांबा होता. आणि जबलपूर एक्स्प्रेसचा कॉर्ड लाइनमुळे २३ मिनिटांचा वेळ वाचतो, त्याच आधारावर चांदूर येथे थांबा देण्यात आला. हे दोन्ही थांबे बंद करून रेल्वे विभागाने चांदूर रेल्वे तालुकावासीयांवर अन्याय केला आहे. रेल्वे विभागाच्या दुर्लक्षामुळे रेल रोको आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे रेल रोको कृती समितीने म्हटले आहे. २ फेब्रुवारी रोजी धामणगाव स्थानकावर रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना निवेदन देऊन यासंबंधी ७ दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र त्यांच्याकडून कोणतेही पत्र आले नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या निषेधार्थ १७ फेब्रुवारी रोजी चांदूर शहर बंद ठेवू आणि त्यानंतर त्याच दिवशी सर्व नागरिक रेल्वे रुळावर येऊन बसून रेल रोको आंदोलन बसु असा निर्णय या बैठकीतून घेण्यात आला. या बैठकीचे संचालन रेल रोको कृती समितीचे अध्यक्ष नितीन गवळी यांनी केले तर आभार सतिष चौधरी यांनी मानले. या बैठकीला नितीन गवळी, शिवसेना ठाकरे गटाचे नेते बंडूभाऊ यादव, संजय चौधरी, आम आदमी पार्टीचे नेते राजाभाऊ भैसे, भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते गुड्डू बजाज, डॉ. सुषमा खंडार, काँग्रेसचे पदाधिकारी हर्षल वाघ, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव प्रा. रवींद्र मेंढे, माकपाचे नेते रामदास कारमोरे, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य बाळासाहेब सोरगिवकर, डॉ. वसंतराव खंडार, जनता दल (से.) जिल्हाध्यक्ष प्रभाकर भगत, भाकपाचे सतिष चौधरी, संघर्ष वाहन चालक – मालक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अविनाश कैलकार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अल्पसंख्यांक शहराध्यक्ष मो. समिर जानवानी, नागरिक विजय नखाते, संतोष खानझोडे, निलेश गुल्हाने, भीमराव खलाटे, निलेश होले, पराग बेराड, मंगेश डाफ, विनोद लहाने, गजाननराव पेठे, कमलकिशोर गुगलीया, प्रशांत ढोले, शितल बेराड, सचिन चुटके, महादेव शेंद्रे, प्रशांत भैसे, हरिसिंग चव्हाण, मनोज भारूका, प्रदीप मेश्राम, लवकुश खुणे, प्रफुल भैसे, शशिकांत गाडेकर, प्रमोद नागणे यांसह अनेक शहरवासी उपस्थित होते. यानंतर रविवारी रेल रोको आंदोलनासंदर्भाचे निवेदन स्थानिक स्टेशन मास्तर यांच्यामार्फत रेल्वे मंत्रालय, रेल्वे महाव्यवस्थापक, डीआरएम कार्यालय नागपुर यांना पाठविण्यात आले.

(बॉक्स)

बैठका घेऊन करणार आंदोलनाचे नियोजन

सदर आंदोलन हे महाआंदोलन राहणार असुन यामध्ये प्रत्येक घटक सहभागी व्हावा याकरिता ठिकठिकाणी कॉर्नर बैठका घेण्यात येणार आहे. तसेच वेळोवेळी नियोजनासंदर्भात सुध्दा बैठका आयोजित करणार आहो. आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन मेहनत करणार असुन थांबा मिळाल्याशिवाय यंदा माघार नाहीच असा निर्धार केला असल्याचे रेल रोको कृती समितीने म्हटले आहे.

(फोटो ओळ – चांदूर रेल्वे – रेल्वे आंदोलनासंदर्भात स्टेशन मास्तर यांना निवेदन देतांना रेल रोको कृती समितीचे सदस्य)

veer nayak

Google Ad