प्रतिनिधी : धामणगाव रेल्वे
जुना धामणगाव येथे राहत्या घरात गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केल्याची दुःखद घटना घडली आहे. प्रवीण किसन उईके वय वर्ष 31 असे मयत युवकाचे नाव आहे .प्रवीण हा विवाहित असून गेल्या वर्षीच त्याचा विवाह झाला होता. तो शेतीचे काम करीत असल्याचे सांगण्यात आले आहे .प्रवीण त्याच्या कडे शेती असल्याचे सांगण्यात येत आहे व काही खाजगी कर्ज असल्याने बहुतेक कर्जपोटी त्याने आत्महत्या केली असे सांगितले जात आहे . खाजगी कर्जामुळे तो सतत चिंतेत असायचा अशी माहिती कुटुंबीयांकडून मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दत्तापूर पोलीस पोचून पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे .घटनेचा पुढील तपास दत्तापूर पोलीस करीत आहे.