कोरम पूर्ण नसताना झाली मासिक सभा मालखेडरेल्वे ग्रामपंचायतचा कारभार, कार्यवाहीकडे दुर्लक्ष!

0
9
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदूररेल्वे, ता. २९ : मालखेडरेल्वे ग्रामपंचायतमध्ये २९ ऑक्टोबर २०२५ रोजी बोलविण्यात आलेल्या ग्रामसभेला सचिवासह ११ सदस्यांपैकी फक्त पाच सदस्य हजर होते. यावेळी ग्रामसभा तहकूब न करता मासिक सभा घेत बेकायदेशीररीत्या प्रोसिडिंग लिहून घेतले. याबाबतची तक्रार ग्रामपंचायत सदस्य विनोद रमेश निचत व प्रणाली नीलेश डकरे यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र एक महिना झाला असतानाही कार्यवाही करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

२६ नोव्हेंबर २०२५ रोजी मालखेडरेल्वे ग्रामपंचायतमधील सदस्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २९ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायतमध्ये मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये ११ सदस्यांपैकी पाच सदस्य हजर होते. त्यामुळे सभेकरिता लागणारा सदस्यांचा कोरम अपूर्ण होता तसेच सचिवसुद्धा यावेळी हजर नसताना मासिक सभा घेण्यात आली. यावेळी ग्रामसेवकाच्या आदेशाने शिपायाच्या हाताने सभेचे प्रोसेडिंग लिहिण्यात आले. त्यामुळे सभेमध्ये पास झालेले सर्व कामे नामंजूर करण्यात यावी, ग्रामसेवकांचे हस्ताक्षर प्रोसेडिंगवरील ग्रामपंचायत सदस्यांना ओळखू येत नसल्याने आर्थिक व्यवहार झाले असून अपूर्ण विकासकामांच्या खर्चाला मान्यता ग्रामसेवकांनी घेतली, कोरमअभावी न झालेल्या मासिक सभेतील सदस्यांच्या सह्या घेऊन बेकायदेशीर आर्थिक अनियमितता यामध्ये झाली आहे. त्यामुळे तक्रारीतील मुद्द्याची सखोल चौकशी करून दोशींवर कारवाई करण्याची मागणी २६ नोव्हेंबर रोजी दिलेल्या निवेदनात करण्यात आली.
मात्र या निवेदनावर अद्याप कार्यवाही करण्यात आली नसल्याने नागरिकांसह तक्रारकर्त्यांनी रोष व्यक्त केला आहे. तथापि, सरपंचांसोबत याप्रकरणाबाबत संवाद साधन्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.
—————————-

आमच्यावर केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. सदर कामे हे अगोदरच्या मासिक सभेमध्ये पास झाले होते.
-शंकर थोरवे
तत्कालीन सचिव, ग्रामपंचायत, मालखेडरेल्वे

veer nayak

Google Ad