मंगरुळ दस्तगीर येथे सार्वजनिक महिला स्नेहमीलन व हळदी-कुंकू सोहळा उत्साहात संपन्न

veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

दि. १ फेब्रुवारी २०२६

मंगरुळ (दस्त): ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मंगरुळ (दस्त) व पेठ रघुनाथपुर येथिल महिलां तर्फे  आयोजित करण्यात आलेला सार्वजनिक महिला स्नेहमीलन व हळदी-कुंकू समारंभ श्री संत गणपती उर्फ हरी महाराज यांच्या मंदीरामध्ये अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला परिसरातील महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला. 

       ​कार्यक्रमाची सुरुवात स्व. श्री. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन झाली. त्यानंतर सम्मानित कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी धामणगाव रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सौ. चंदाताई रामदास निस्ताने व त्यांच्या सोबत सौ. माधुरीताई संदीपराव भोंगे, सौ. माधुरीताई अविनाश दुधे,सौ. प्रफुल्लताताई वि. आंबटकर, सौ. दुर्गाताई प्र. देवगडे, सौ निलिमाताई मो. रबडे, सौ. वैशालीताई सु. निमकर, सौ. मानिशाताई गि. सुरोशे, श्रीमती कल्पनाताई श. ठाकरे यांच्या हस्ते श्वेत निशानधारी अजातीय मानव संस्थेचे प्रणेते श्री संत गणपती उर्फ हरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात येऊन, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर यांच्यासुद्धा प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

         त्यानंतर कार्यक्रमास उपस्तीत प्रमुख अतिथींचे स्वागत सौ. गायत्रीताई प्र. शेटे यांनी केले. सौ. माधुरीताई सं. भोंगे यांचे स्वागत सौ. सुजाताताई रा. कडवे, सौ. माधुरीताई अ. दुधे यांचे स्वागत सौ. निर्मलाताई सं. निमकर, सौ प्रफुल्लताताई वि. आंबटकर यांचे स्वागत सौ. पौर्णिमाताई दारव्हेकर, सौ. दुर्गाताई प्र. देवगडे यांचे स्वागत सौ. संगीताताई सु. टाले, सौ. निलिमाताई मो. रबडे यांचे स्वागत सौ. विजयश्री ताई वि. कुत्तरमारे, सौ. मनीषाताई गि. सुरोशे यांचे स्वागत सौ. प्रितिताई मु. जयसिंगपुरे व श्रीमती कल्पनाताई श. ठाकरे यांचे स्वागत सौ. सुजाताताई सु. लहाबर यांच्या हस्ते करण्यात आले.

         त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सौ. चंदाताई रामदास निस्ताने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी त्या म्हणाल्या की, “”हळदी-कुंकू हा केवळ एक सोहळा नाही, तर तो आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. हळद आणि कुंकू हे सौभाग्य, मांगल्य आणि पावित्र्याचे प्रतीक मानले जाते. या निमित्ताने आपण एकमेकींना भेटतो, सुख-दु:ख वाटून घेतो आणि आपल्यातील स्नेह अधिक दृढ करतो.” आपल्या भाषणाच्या शेवटी सौ. चंदाताईंनी महिलांना एकमेकींच्या प्रगतीत सहभागी होण्यास व एकमेकींना आधार देण्यास सांगितले.

         भाषणानंतर वाण वाटण्यास सुरवात झाली यावेळी पारंपारिक पद्धतीने सुवासिनींनी एकमेकींना हळद-कुंकू लावून वाण दिले. तिळगुळ वाटप करून ‘तिळगुळ घ्या, गोड गोड बोला’ म्हणत एकमेकींना शुभेच्छा देण्यात आल्या.

       कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबादारी कु. मिनलताई घोटकर यांनी अत्यंत उत्कृष्ट रित्या पार पाडली व कार्यक्रमाची सांगता सौ. आशाताई रा. पोपळघटे यांच्या हस्ते आभार प्रदर्शन करून करण्यात आली. 

      ​ कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, सौ. माधुरीताई दुधे, सौ. माधुरीताई भोंगे, सौ. निर्मलाताई रबडे, सौ. संध्याताई मेने, सौ. संगीताताई निमकर, सौ. दुर्गाताई देवगडे,  सौ अर्चनाताई कावळे, सौं स्नेहाताई ठाकरे, सौ. निर्मलाताई निमकर, सौ. वैशालीताई शिळणकर, सौ. वैशालीताई निमकर, सौ. पोर्णिमाताई दाव्हेंकर, सौ. सुजाताताई कडवे, सौ. मनिषाताई सुरोसे, सौ. ममताताई शेटे, सौ. शितलताई बुटले, सौ. अर्चनाताई भोंगे, सौ. हर्षालीताई शिंदे, सौ. संगिताताई टाले, सौ. सुनिताताई शेंडे, सौ. प्रफुल्लताताई आंबटकर, सौ. सुनिताताई शेंडे, सौ. रेखाताई आंबटकर, सौ. सारिकाताई गायकवाड, सौ. माधुरीताई भोसले, सौ. काजलताई गायकवाड, सौ. पल्लवीताई डाफे, सौ. गायत्रीताई शेटे, सौ. रेखाताई नारनवरे, सौ. रजनीताई राऊत, सौ. विजयश्रीताई कुत्तरमारे, सौ. काजलताई चौधरी, सौ. वैशालीताई बन्सोड, सौ. निलीमाताई राऊत, सौ. प्रितीताई जयसिंगपुरे, सौ. आशाताई पोपळघाटे, सौ. मिनाताई लहाबर, सौ. प्रतिभाताई घरत, सौ. रजनीताई डाहाके, सौ. शिल्पाताई ठाकरे, सौ. मिनाक्षीताई राऊत, सौ. संगिताताई सहारे, सौ. वंदनाताई शिरभाते, सौ. प्रणालीताई कडु, सौ. सुजाताताई लहाबर, सौ. सरीताताई भिल, सौ. ज्योतीताई खोपे, सौ. रेखाताई लोंदे,सौ. संगिताताई सिरभाते, सौ. सरिताताई डाफ, सौ. सोनालीताई हिरवे, सौ. शिवानीताई कुऱ्हटकर, सौ. रुपालीताई खंडारे, सौ. वैशालीताई डाफ, सौ. स्मिताताई निमरट, सौ. चैतालीताई भोयर, सौ. पुजाताई खंडारे, सौ. दुर्गाताई निमकर, सौ. उषाताई सुने, सौ. पुजाताई इंगोले, सौ. अंजलीताई गुल्हाणे, सौ. शितलताई बुटले, सौ.शुभांगीताई भुजाडने, सौ. जयशीताई मते, सौ सविता ताई आंबडकर,सौ. भारतीताई गुल्हाने, सौ. संगिताताई माहुलकर, संगीता आंबटकर, यांनी विशेष परिश्रम घेतले.

मुख्य संपादक राजू गायकवाड

Google Ad