जनस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेत विविध खेळ स्पर्धेचे आयोजन

0
4
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अमरावती, दि. 23 (जिमाका): जनस्वराज्य बहुउद्देशीय संस्था व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नांदगाव खंडेश्वर येथे विविध खेळ स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

जनस्वराज्य बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष भूपेंद्र जेवडे, नेहरू युवा केंद्र जिल्हा समन्वयक स्नेहल बासुतकर, स्वराज्य प्रशासकीय अकादमीचे राहुल हजारे, प्रतीक कोल्हे, गजानन शेळके, दर्शन मारोटकर उपस्थित होते.

खेळाला आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. जीवनात व्यथा आणि चिंता विसरायला लावण्याचे सामर्थ्य खेळामध्ये आहे. मनाला विरंगुळा देणे आणि मन ताजेतवाने करण्याचे काम खेळ करतात. ज्या खेळात भरपूर श्रम किंवा शारीरिक हालचाली कराव्या लागतात त्या खेळांमुळे खेळाडूंचा व्यायाम होतो. शरीर काटक व बळकट बनवण्यास खेळ मदत करतात. खेळांमुळे मनोधैर्य, चिकाटी, खिलाडूपणा इत्यादी गुणांची वाढ होते. सांघिक खेळ खेळल्यामुळे सहकार्य, संघभावना वाढीस लागते आणि नेतृत्वगुणांचा विकास होतो, असे प्रतिपादन श्री. जेवडे यांनी यावेळी केले.

कबड्डी, खो-खो, 100 मीटर धावणे स्पर्धा, गोला फेक, खो-खो अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. विजेता संघाला प्रथम क्रमांक व द्वितीय क्रमांक तसेच वैयक्तिकता खेळाडूंना प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक पारितोषिक म्हणून नेहरू युवा केंद्र, माय भारत ,अमरावती, युवा कार्यक्रम विभाग, युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्फत शिल्ड देण्यात आले. या खेळासाठी नांदगाव तालुक्यातील विविध मंडळांनी व खेळाडूंनी सहभाग नोंदविला.

veer nayak

Google Ad