सार्वजनिक बांधकाम विभागात बाळा जगताप यांच्या नेतृत्वात अन्यायग्रस्त सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी बांधले कार्यकारी अभियंत्याच्या दालनासमोर डिग्रीचे तोरण

0
115
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अन्यायग्रस्त सुशिक्षित बेरोजगार अभियंता कंत्राटदारांनी मांडले बांधकाम अभियंत्याच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन डिग्रीच्या प्रति फेकून केला निषेध

आर्वी, प्रतिनिधी पंकज गोडबोले

आर्वी : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत सोळंके हे गेल्या दोन वर्षांपासून हुकूमशाही आणि मनमानी कारभार चालविण्याच्या एकाधिकार पद्धतीमुळे चांगलेच चर्चेत आले आहे.ऑनलाइन ई-निविदेमध्ये पात्र असलेल्या कंत्राटदारांना अपात्र ठरवीत मनमानी पद्धतीने निविदा मॅनेज करीत असल्याचा आरोप वंचित असलेल्या सर्व कंत्राटदारांनी केला. सदरचा काम मॅनेज पद्धतीचा गोरखधंदा प्रहार सोशल फोरमचे संस्थापक अध्यक्ष बाळा जगताप यांनी चव्हाट्यावर आणला.तब्बल 200 कोटीच्या निविदेचा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला आहे.

आष्टी येथील टेकडीवाले बाबा दर्गाह दुरुस्तीचे काम शासनाकडून मंजूर झाले होते. यासाठी एक कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.सदरचे काम ऑनलाईन ई- निविदेमध्ये प्रकाशित करण्यात आले होते.यामध्ये एकूण 12 कंत्राटदारांनी सहभाग घेतला. आर्वी, आष्टी, कारंजा यासह वर्धा जिल्ह्यातील कंत्राटदार या निविदेमध्ये सहभागी झाले होते. पात्र कंत्राटदारांना कारण न देता वगळण्यात आले. एकूण 12 आलेल्या कंत्राटदारांना डावलून अमरावती जिल्ह्यातील एका एजन्सीला मॅनेज करून देण्याचा महान प्रताप या कार्यकारी अभियंत्याने केला आहे.

एवढा मोठा हुकूमशाही कारभार कोणाच्या इशाऱ्यावरून चालत आहे, हे मात्र सर्वच कंत्राटदारांना समजले नाही. अन्यायग्रस्त कंत्राटदारांनी कार्यकारी अभियंताच्या दालनात भेटून आपली कैफियत मांडली. मात्र कार्यकारी अभियंतांनी कोणाचेही काहीही ऐकले नाही. त्यामुळे कंत्राटदारांनी प्रहार सोशल फोरमचे संस्थापक अध्यक्ष बाळा जगताप यांची भेट घेतली, आणि न्याय देण्याची मागणी केली.

त्यानंतर बाळा जगताप यांनी धारेवर धरत याप्रकरणी जाब विचारला मात्र मुजोर आणी हेकेखोर वृत्तीच्या कार्यकारी अभियंत्याने कार्यालयात येण्याचे टाळून चक्क पोलीस बळाचा वापर करीत सुरू केलेले आंदोलन दडपण्याचा प्रकार चालविला असल्याचा आरोप सुशिक्षित बेरोजगार अभियंता कंत्राटदारांनी केला आहे.

याप्रकरणी बाळा जगताप यांच्या नेतृत्वात आज सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंत्याच्या दालनासमोर बाळा जगताप यांच्या नेतृत्वात सुशिक्षित बेरोजगार अभियंतांनी डिग्रीचे तोरण बांधून व डिग्री फेकून दिल्या. काम मॅनेज पद्धतीचा तीव्र निषेध केला. त्यानंतर आंदोलन करीत कंत्राटदारांनी जोरदार नारेबाजी केली. भ्रष्टाचारी कार्यकारी अभियंता सोळंके यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कार्यवाही होणार असल्याच्या धाकाने त्यांनी 50 हजाराचे डिजिटल लॉक दालनाला बसविला असा आरोपही बाळा जगताप यांनी केला.

सदर कार्यकारी अभियंता प्रशांत सोळंके आज दौऱ्याच्या नावाखाली गायब होते. आर्वी येथील कार्यालयात सर्व सुशिक्षित बेरोजगार अभियंता कंत्राटदारांनी बाळा जगताप यांच्या नेतृत्वात कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयावर डिग्री फेकून आपला संताप व्यक्त केला. व निषेध नोंदविला याप्रकरणी कार्यकारी अभियंत्याच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. उपकार्यकारी अभियंता लांजेवार यांना निवेदन दिले.सदर निवेदनाच्या प्रतिलिपी अधीक्षक अभियंता चंद्रपूर,मुख्य अभियंता नागपूर, यांच्यासह मंत्रालयातील सर्व विभागप्रमुखांना पाठविण्यात आल्या. या निवेदनातील मागणीप्रमाणे सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांच्यावर होत असलेल्या अन्याय निदर्शनात आणून दिला. गेल्या दोन वर्षांपासून शासन नियमानुसार लॉटरी पद्धतीने कामे वाटप करण्यात आले नाही यासाठी सभाही घेण्यात नाही.शासन निर्णय नुसार सुबेअ अभियंता यांना प्रत्येक यादी मध्ये ३३% या नियम नुसार काम देण्यात आले नाही.शासन निर्णय क्र. CAT/२०२२/ प्र.क्र.५०/ इमा २ या नियम नुसार १.५ कोटी पर्यन्तच्या काम साठी स्वत मालकीचे hot mix plant व कोणतेही साहित्य ची अट निविदा मध्ये समाविष्ट झाली नाही परंतु tribal या निविदा अंतर्गत मागविण्यात आलेली निविदा क्र. ०७/२०२४-२५ मध्ये ही अट टाकण्यात आली होती व आमची निविदा रद्द करण्यात आली नाही. १ वर्ष पासून ई-निविदा सुबेअ ची मीटिंग लावण्यात आली नाही.शासन निर्णय क्र. CAT/२०२२/ प्र.क्र. १०४ / इमा २ या नियम नुसार १० लक्ष ते १.५ कोटी पर्यन्तच्या निविदा ८ दिवस प्रकाशित कालावधी असून सुद्धा कामे १ महिना पर्यंत प्रकाशित करीत आहे. मागविण्यात आलेली निविदा क्र. ०९/२०२४-२५ Online ६ महीने झाले असून उघडण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या कंत्राटदारांनी बाळा जगताप यांच्या नेतृत्वात आंदोलनाचा मार्ग पुकारला. आता याप्रकरणी शासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

veer nayak

Google Ad