चांदूर रेल्वे तालुका प्रतिनिधी
चांदूर रेल्वे शहरातील वीज वितरण कंपनी कडून ग्राहकांच्या घरात असलेले वीज मिटर बाहर कढण्यात आले व आता हेच वीज मीटर एका बॉक्स मध्ये लावण्याचे काम वीज पुरवठा कंपनी कडून सुरू असल्याने शहरातील लोकांनी विरोध केला आहे.
वीज वितरण कंपनी व ठेकेदार यांच्या मनमनाई कारभाराला आज बानाईत प्लॉट येथील नागरिकांनी ग्राहक हक्क या नात्याने विरोध दर्शविला असून आमचे वीज मीटर हे रस्त्यावर खांबावर बॉक्स मध्ये न लावता आमच्या घराती भिंतीवर राहू घ्या उघड्या वीज वितरण कंपनीच्या डीपीचे झाकण लावल्या जात नाही तर अनेक ठिकाणी डीपीचे हालबेहाल झाले आहे तर या बॉक्स चे होणार नाही हे कशावरून रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबावर हे मीटर सुरक्षित नसुन ते आमच्य घरांच्या भिंतीवरच सुरक्षित आहे म्हणून आमचे मीटर काढण्यात येऊ नये म्हणून बानाईत प्लॉट मधील नागरिकांनी विरोध दर्शवित लिखित सही केलेले निवेदन उपअभियंता वीज वितरण कंपनी यांना दिले या निवेदनावर सुरेशसिंग ठाकूर,प्रमिल जालना,अॅड शिवाजी देशमुख,रहीम पठाण,चेतन राॅय,संजय कोल्हे,सुधिर गंगन,किशोर गंगन,भाष्कर जोशी, मनीष राॅय,एस पी भुयार,अब्दुल हमीद, आनंद जयस्वाल,प्रभाकर सोनोने यांनी सह्या करून विरोध केला आहे.