भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सर्वपक्षीयांकडून . धामणगावात निषेध

0
57
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याची घटना गंभीर असून, या घटनेचा सर्वपक्षीयांकडून धामणगाव शहरातील नगरपरिषद येथे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकमुखाने या हल्ल्याला लोकशाहीवरचा आघात म्हटले असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उबाटा गट) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) शिवसेना शिंदे गट वंचित बहुजन आघाडी सह संविधान प्रेमी तसेच इतर पक्षांच्या नेत्यांनी न्यायव्यवस्थेचा सन्मान राखण्याचे आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी तात्काळ पावले उचलावीत, असे आवाहन केले आहे.“न्यायालयीन स्वातंत्र्य आणि न्यायाधीशांचा सन्मान हा लोकशाहीचा कणा आहे. या हल्ल्याने सर्व देशवासीयांचे मन स्तब्ध झाले आहे,” असे मत नेत्यांनी व्यक्त केले.हल्ल्याचा निषेध करताना सर्वपक्षीय नेत्यांनी एकमुखाने भूषण गवई यांना संपूर्ण पाठिंबा दर्शवला आहे.

veer nayak

Google Ad