आर्वी, दि.१:- लोकसभा निवडणुकीत राजकीय पोळी शेकण्याच्यादृष्टिने अल्पावधीत महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भ्रष्टपध्दतीने उभारलेला निकृष्ट दर्जाचा पुतळा कोसळल्याने महाराष्ट्रातील प्रत्येकांच्या भावनेला जबर ठेवच पोहचली आहे तर दुसरीकडे बदलापुर येथील शाळकरी मुलींवरील झालेल्या अत्याचाराला महाराष्ट्रातील सरकार जबाबदार असुन या कृत्याचा निषेध करण्याकरीता महाविकास आघाडीच्यावतीने मयुराताई काळे यांच्या नेतृत्वात रवीवारी (ता.एक) मार्चा काढण्यात आला व तहसीलदार हरिष काळे यांना निवेदन देवुन संबंधीतांवर फौजदारी स्वरुपाची कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
लोकसभा निवडणुकीत मत मिळविण्याच्या दृष्टिने अल्पावधीत जयदेव आपटे या नवख्या शिल्पाकाराकडून महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा निकृष्ट दर्जाचा पुतळा उभारला आणी उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. मात्र अवध्या आठ महिण्यातच पुतळा कोसळला यामुळे महाराष्ट्रातील शिवसैनीकच नव्हेत तर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांना याचा मोठा धक्का बसला. पुतळा बनवीण्याच्या कंत्रापासुन तर सर्वस्तरावर यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असुन यात ख्रुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुत्रापासुन तर राणे परिवाराचा सहभाग असल्याचे प्रथम दर्शनी दिसुन येत असल्याने याची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांच्या माध्यमातुन करण्यात यावी व दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनामधुन करण्यात आली आहे.
तसेच तत्पुर्वी बदलापुर येथील अल्पवयीन शाळकरी मुलींवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली असतांना सुध्दा सरकार जागृत झाले नाही. दिवसेंदिवस यात वाढ होत असुन याला राज्यातील महायुती सरकारचे गृहमंत्रालय जबाबदार असल्याचा आरोप या निवेदनामधुन करण्यात आला. याला लावु न शकणारे मंत्री देवेंद्र फडवीस हे जबाबदार असुन त्यांना पद सांभाळता येत नसल्याने त्यांनी राजीनाम द्यावा अशी मागणी करण्यात आली व बदलापुर घटनेचा तिव्र शब्दात निषेध करण्यात आला.
या मोर्च्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष याशिवाय महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदरचे वृत्त आपल्या लोकप्रीय दैनीकामध्ये प्रसिध्द करुन आमची मागणी सरकार पर्यंत पोहचवीण्याकरीता मदत करावी हि विनंती
सही
दशरथ जाधव
(शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष)