श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय पिंपळखुटा येथील कार्यक्रम अधिकारी व राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे एकूण १९० स्वयंसेवक यांनी माय भारत पोर्टलवर पूर्ण केले रजिस्ट्रेशन.

0
3
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

(धामणगाव रेल्वे प्रतिनिधी)

डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला सलग्नित व श्री संत शंकर महाराज आश्रम ट्रस्ट द्वारा संचालित श्री. संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय, पिंपळखुटा यांचे वतीने नुकतेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी व सर्व वर्षाचे एकूण १९० विद्यार्थी स्वयंसेवक यांनी माय भारत पोर्टलवर रजिस्ट्रेशन पूर्ण केले आहे. रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्णपणे स्वयंसेवकांना समजावण्याचे दृष्टीने राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा दीपक बोंद्रे, प्रा पवन शिवणकर व सहाय्यक श्री सुहास आप्तूरकर यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष समजावून सांगितले. त्यानंतर सर्व स्वयंसेवकांनी आपल्या अँड्रॉइड मोबाईल द्वारे माय भारत पोर्टलवर आवश्यक ती माहिती भरून आपले रजिस्ट्रेशन पूर्ण करून सर्टिफिकेट प्राप्त केले. याद्वारे विविध राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाचे फोटो प्रत्येक महाविद्यालयाद्वारे माय भारत पोर्टलवर वेळोवेळी अपलो वीड करण्याचे निर्देश विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला व कार्यक्रम समन्वयक (रा.से.यो.) महाराष्ट्र शासन यांनी केले आहे

 

या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री नंदूशेठ चव्हाण व्यवस्थापन समिती पदाधिकारी श्री राजू भाऊ भोगे, एडवोकेट श्री प्रकाशराव देशमुख प्राचार्य सौ वृषाली देशमुख सर्व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक यांचे अमूल्य सहकार्य लाभले.

veer nayak

Google Ad