धामणगाव रेल्वे, धामणगाव मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. रामकृष्ण टोकसे यांचे चिरंजीव प्राध्यापक डॉ. विजय रामकृष्ण टोकसे यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची पीएचडी पदवी प्राप्त झाली आहे विद्यापीठाने त्यांना “डॉक्टरेट” ही पदवी प्रदान केली आहे डॉ. विजय टोकसे भारती महाविद्यालय आर्णी जि. यवतमाळ येथे इतिहास विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असून त्यांनी नेट परीक्षा सुद्धा उत्तीर्ण केलेली आहे त्यांचा पीएचडी चा विषय ” विदर्भातील कामगार चळवळीच्या ऐतिहासिक विश्लेषण ” असा आहे ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन उच्च पदापर्यंत पोहचून आपले ध्येय पूर्ण करणारे डॉ. विजय टोकसे सुरुवातीपासूनच शिक्षणामध्ये प्राविण्य प्राप्त आहेत त्यांचे वडील डॉ. रामकृष्ण टोकसे हे ग्रामीण भागातून असून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत आपल्या यशाची श्रेय विजय टोकसे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. भि.र.वाघमारे डॉ. संतोष बनसोड तसेच आई-वडिलांना देतात या यशाबद्दल डॉ.विजय टोकसे यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे
Home धामणगाव रेल्वे प्राध्यापक डॉ. विजय रामकृष्ण टोकसे यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची पीएचडी पदवी...