धामणगाव रेल्वे,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत सोमवारी आभासी पध्दतीने १५०० रोड ओव्हर ब्रिज चे लोकार्पण तसेच ५५४ रेल्वे स्थानकांची कायापालट करण्यासंदर्भात पायाभरणी केली यामध्ये महाराष्ट्राचे २४८ स्टेशन समाविष्ट करण्यात आले आहेत त्याच अनुषंगाने धामणगाव रेल्वे स्थानका जवळील आर.यु.बी ७५ परसोडी येथील अंडर ब्रिजचे लोकार्पण करण्यात आले
सोबतच याच मतदारसंघातील कोलकत्ता मुंबई लोहमार्गावरील रामगाव, हिंगणगाव येथील सुद्धा अंडर ब्रिजचे लोकार्पण करण्यात आले पंतप्रधानांच्या हस्ते आभासी झालेल्या या कार्यक्रमांमध्ये मंचावर मंडल वित्त प्रबंधक रविंद्र सिंह, धामणगाव रेल्वे मतदार संघातील प्रमुख रावसाहेब रोठे आर.पी.एफ चे ठाणेदार छेदीलाल कनोजिया,सल्लागार समिती सदस्य कमल छांगाणी, डॉ.असित पसारी,गोपाल भूत,अर्चना राऊत, दिनेश मुंदडा, सुनील साकुरे, डॉ. पवन शर्मा प्रामुख्याने उपस्थित होते पंतप्रधानांनी आभासी केलेल्या लोकार्पणाच्या पूर्वी उपरोक्त मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले धामणगाव रेल्वे स्टेशनला यापूर्वीच्या योजनेअंतर्गत विकासाकरिता २० कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून या योजनेअंतर्गत स्टेशनवर इंडिकेटर, नवीन तिकीट घर, शेड तसेच अन्य सुविधा उपलब्ध होणार आहेत उपरोक्त लोकार्पणप्रसंगी मान्यवरांनी विचार व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात रेल्वेचा ऐतिहासिक कायापालट झाला असल्याचे विचार व्यक्त केले अनेक मेट्रो,वंदे भारत एक्सप्रेस सोबतच लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या सुरू केल्यामुळे भारतात आता कुठेही प्रवास सहज झालेला आहे ओव्हर ब्रिज आणि अंडर ब्रिज मुळे अनेक समस्यांचे निराकरण झाले आहे या योजनाबद्ध विकासाकरिता पंतप्रधान मोदी यांचे कौतुक सर्वच मान्यवरांनी आपल्या भाषणातून केले कार्यक्रमांमध्ये सामाजिक कार्यकर्ता रणजीत पोटफोडे, राजेश मारवे वरिष्ठ अनुभाग अधिकारी संजय वाघमारे,प्रवीण चंद्रीकार,अश्विन जयस्वाल यांच्यासह परिसरातील मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन प्रेम कुमार आनंद लेखा सहाय्यक नागपूर यांनी केले