शाश्वत ग्राम विकास केंद्राला महाराष्ट्र लोक विकास मंच राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथ अण्णा तोडकर यांची भेट

0
8
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदुर रेल्वे – येथील साईबाबा ग्रामीण विकास संस्था, ग्रामसेवा लोक अभियान अंतर्गत शाश्वत ग्राम विकास केंद्र हया सामाजिक प्रकल्पाला दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्र लोक विकास मंच या सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथ अण्णा तोडकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष एम एन कोंढाळकर यांनी सोनगाव रोडवरील शाश्वत ग्राम विकास केंद्रा मध्ये चालणारे शाश्वत कौशल्य विकास,प्रकल्प ज्येष्ठ नागरिक स्नेह प्रकल्प, हात मदतीचा, शाश्वत शेती वर्मी कंपोस्ट प्रात्यक्षिक, या उपक्रमाला भेट देऊन संस्थेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

या शाश्वत ग्राम विकास केंद्राच्या माध्यमातून चांदुर रेल्वे परिसरामधील सामाजिक आर्थिक मानसिक विकासाकरिता निश्चितच या केंद्राचा उपयोग होईल इथे सुरू असलेले सर्व प्रकल्प ही समाज उपयोगी आहे अशा प्रकारे तोडकर यांनी व्यक्त केले. आदरणीय कोंढाळकर सर यांनी या केंद्राला शाश्वत पद्धतीने अधिक अधिक बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पुढील काढत महाराष्ट्र लोकविकास मंच ग्रामसेवा लोक अभियानाचे चालू असलेल्या उपक्रमाला निश्चितच विदर्भातील सामाजिक कार्यकर्त्याचे बळकटीकरण करण्यासाठी सहकार्य मार्गदर्शन करेल असे मत व्यक्त केले. या ग्रामसेवा लोक अभियान चे सयोजक बंडू आंबटकर, यांनी शाश्वत विकास  प्रशिक्षण केंद्राचे उद्दिष्ट महाराष्ट्र विकास मंचाच्या टीम समोर मांडले. या ग्राम विकास संस्थेचे दिलीप बिसेन, पुण्या वरून आलेले हरिचंद्र ढाकणे, नागेश गायकवाड यांचीउपस्थिती होती.

veer nayak

Google Ad