शेतकरी हित जोपासणाऱ्या लोकसभा प्रतिनिधीलाचं प्राधान्य. शेतकरी मित्र प्रवीण पाटील कावरे

0
9
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

प्रतिनिधी

संपूर्ण भारत देशात लोकसभा निवडणुकीचे वारे प्रचंड वेगाने वाहू लागले आहे .प्रत्येक पक्षातर्फे विविध उमेदवाराची चाचपनी करण्यात येत आहे तर सत्ताधारी व विरोधी गटांनी सुद्धा आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले जनतेचा कौल हा निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरेल आपण निवडून दिलेला प्रतिनिधी हा आपल्या मतदारांशी व मतदार संघाशी कितपत प्रामाणिक आहे याची चाचणी करणे सुद्धा गरजेचे आहे केवळ राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी काही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर काही व्यावहारिक दृष्ट्या उमेदवार निवडणूक लढवत आहेत ,तर काही उमेदवार केवळ स्वतःच्या स्वार्थापोटी समाजाची मते विभाजित करत आहेत , शेतकऱ्यांच्या प्रतिकूल परिस्थितीत आम्ही शेतकरी मित्र शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतो, अशावेळी कोणताही लोकप्रतिनिधी शेतकरी हित जोपासताना दिसत नसतो. शेतकऱ्यावर अन्याय होत असताना मी व माझे सहकारी शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी तालुक्यात अग्रस्थानी आहोत,हे शाश्वत सत्य आहे अनेक वेळा आम्ही आंदोलने उभारली परंतु या स्वार्थी दुनियेत शेतकऱ्याचा नुसता निवडणुकी पुरताच उमेदवाराला पुळका येत असतो, सत्ता स्थापन झाल्यानंतर शेतकरी हा पाच वर्ष कुणालाच दिसत नाही .असे स्वार्थी वृत्तीचे उमेदवार आम्ही शेतकरी मित्र निवडून देणार नाही .लोकसभेचा प्रतिनिधी हा कुण्याही पक्षाचा असावा परंतु हित जोपासणाऱ्या उमेदवारालाच आम्ही प्रथम प्राधान्य देऊ .असे स्पष्ट मत प्रवीण पाटील कावरे शेतकरी मित्र यांनी व्यक्त केले आहे.

veer nayak

Google Ad