प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट व शोध प्रतिष्ठान द्वारा अमरावती येथे आयोजित पुष्प प्रदर्शनी मध्ये श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालयाचे सुयश. 

0
84
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

(धामणगाव रेल्वे प्रतिनिधी)

डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला सलग्नित व श्री संत शंकर महाराज आश्रम द्वारा संचालित श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय पिंपळखुटा येथील विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी राजुरकर व कुमारी नेहा टेकाडे यांनी प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट व शोध प्रतिष्ठान द्वारा सांस्कृतिक भवन अमरावती येथे आयोजित पुष्प प्रदर्शनी मध्ये सहभाग नोंदवून पुष्प रांगोळी स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले.

यावेळी पुष्पप्रदर्शन मधून “पर्यावरण वाचवा” चा संदेश प्रधान करण्यात आला. यावेळी अभिनेत्री डेझी शहा, ट्रस्टचे अध्यक्ष व आमदार सौ. सुलभाताई खोडके, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता महापात्रा, पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, गार्डन क्लबचे अध्यक्ष डॉ सी एम देशमुख, डॉ. भोजराज चौधरी, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते .

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सी यु पाटील यांचे मार्गदर्शनाखाली तसेच प्रा वैष्णवी बिजने व प्रा. वृषाली देशमुख यांचे नेतृत्व मध्ये सदर विद्यार्थिनी यांनी पुष्प रांगोळी प्रदर्शनात सहभागी होऊन द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले.

महाविद्यालयातील यशस्वी विद्यार्थिनींचे महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री नंदू शेठ चव्हाण, स्थानिक व्यवस्थापन समिती पदाधिकारी एडवोकेट प्रकाशराव देशमुख, राजूभाऊ भोगे, प्राचार्य डॉ सी यु पाटील सौ वृषाली देशमुख, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा दीपक बोंद्रे, प्रा पवन शिवणकर, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, व रासेयो स्वयंसेवक यांचे अमूल्य सहकार्य लाभले..

veer nayak

Google Ad