मुलींना उच्च शिक्षण, मोफत शिक्षण योजनेमध्ये खाजगी अभिमत विद्यापीठाचा समावेश करा आ प्रताप अडसड यांची मागणी

0
90
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगावं रेल्वे

मुलींना उच्च शिक्षण, मोफत शिक्षण योजनेमध्ये खाजगी अभिमत विद्यापीठाचा

तसेच स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे यांचा समावेश करण्याची मागणी आमदार प्रतापदादा अडसड यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे केली आहे. 

राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार मुलींकरिता उच्च शिक्षणासाठी मोफत शिक्षण लागू झालेले आहे. हा क्रांतिकारक व अभिनंदननीय निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. परंतु या शासन निर्णयामध्ये खाजगी अभिमत विद्यापीठे तसेच स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे यांना वगळण्यात आले आहे. खाजगी अभिमत विद्यापीठांमध्ये सुद्धा सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस मधून ऍडमिशन झालेल्या परंतु आर्थिक मागास असलेल्या मुली मोठ्या प्रमाणात आहे. शासन निर्णयातील या अटीमुळे अनेक मुलींना या योजनेपासून वंचित रहावे लागत आहे. याबाबतीत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे ही बाब शासनाच्या लक्षात आणून देणे आवश्यक होते आ प्रताप अडसड यानी शासनाला पत्र लिहत यासंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा व आर्थिक मागास असलेल्या सर्व मुलींना मोफत शिक्षणाचा लाभ मिळण्याकरिता खाजगी अभिमत विद्यापीठे व स्वयअर्थसहाय्यित विद्यापीठे यांचा देखील या योजनेमध्ये समावेश करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे

veer nayak

Google Ad