आयटीआयच्या फलश्रृतीचं रूपांतर उपजिवीकेमध्ये होणे गरजेचे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक प्रदीप घुले यांचे मत

0
84
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदूर रेल्वे आयटीआयमध्ये छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर व रोजगार मेळावा

चांदूर रेल्वे – (ता. प्र)

आयटीआयमध्ये काळानुरून नवी न तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण देण्यात येत आहे. आयटीआयचे अनेक विद्यार्थी मोठ्या शहरांमध्ये तसेच परदेशात सुध्दा नोकरीला आहे. त्यामुळे कौशल्य प्राप्त करून त्याचा उपयोग उज्वल भविष्याकरिता करावा, होम सिकनेस (घराची ओढ) बाजुला ठेवा. आयटीआय पुर्ण केल्याच्या फलश्रृतीचं रूपांतर उपजिवीकेमध्ये होणे गरजेचे आहे असे मत अमरावती येथील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक प्रदीप घुले यांनी व्यक्त केले. ते औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चांदूर रेल्वेच्या वतीने शुक्रवारी (ता. १४ जुन) स्थानिक आयटीआय येथे आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर व रोजगार मेळाव्यात बोलत होते.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, म. रा. मुंबई यांच्या निर्देशानुसार सदर छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन शुक्रवारी चांदूर रेल्वे आयटीआयमध्ये केले होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन अमरावती येथील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक प्रदीप घुले यांच्या हस्ते झाले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गजानन सहकारी सुतगिरणीच्या मुख्य व्यवस्थापिका, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त डॉ. अर्चना रोठे (अडसड) यांची उपस्थिती होती. तसेच प्रमुख पाहुणे जवाहर सहकारी सुतगिरणीचे संचालक प्रसन्ना पाटील, धामणगाव व चांदूर रेल्वे आयटीआयचे प्राचार्य दिनेश बोबडे, मार्गदर्शक वक्ते विजय राऊत व सचिन पांडे यांची उपस्थिती होती. डॉ. अर्चना रोठे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल धामणगाव आयटीआयचे गटनिदेशक प्रफुल्ल धोटे, चांदूर रेल्वे आयटीआयचे शिल्प निदेशक अनिल खडसे व कैलास चौधरी यांना गौरविण्यात आले. यानंतर प्रसन्ना पाटील यांनी विद्यार्थ्यांना रोजगाराविषयी मार्गदर्शन केले. तसेच इयत्ता दहावीनंतर करिअर कसे निवडावे, दहावी व बारावी नंतरच्या शिक्षणाच्या विविध संधी या विषयावर वक्ते सचिन पांडे यांनी मार्गदर्शन केले. तर व्यक्तिमत्व विकास, भविष्यातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, नवीन तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी इतर विविध विषयांबाबत मार्गदर्शन वक्ते विजय राऊत यांनी केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य दिनेश बोबडे यांनी तर संचालन नांदगाव खंडेश्वर आयटीआयचे शिल्प निदेशक निरंजन मुरादे व आभार प्रदर्शन चांदूरचे प्रभारी प्राचार्य धनंजय भोगे यांनी केले. सदर करिअर शिबीरासोबतच शिकाऊ उमेदवारी व रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन सुध्दा करण्यात आले होते. याला सुध्दा चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे व नांदगाव खंडेश्वर येथील शिल्प निदेशक, कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाकरिता तीनही तालुक्यातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्मार्ट क्लासरूमचे उद्घाटन

स्किल इंडिया व डिजिटल इंडिया या उपक्रमांतर्गत स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम (स्मार्ट) तयार करण्यात आली आहे. या क्लासरूममध्ये इंटरअक्टिव पॅनल, संगणक सेवा, उत्तम बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. या क्लासरूमचे उद्घाटन सुध्दा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक प्रदीप घुले यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यामुळे आता अत्याधुनिक कौशल्य विकास प्रशिक्षण याठिकाणी प्रशिक्षणार्थ्यांना मिळणार आहे.

veer nayak

Google Ad