4 आरोपी पोलीस ताब्यात 24 हजार370 रुपयांचा मुद्देमाल जप्त मालखेड येथे पोलिसांची जुगारावर धाड

0
172
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदुर रेल्वे तालुका प्रतिनिधी

चांदुररेल्वे पोलीस स्टेशन हद्दीतील मालखेड येथे खुल्या जागेवर सुरू असलेल्या जुगारावर चांदुर रेल्वे पोलिसांनी रविवारी सायंकाळी पाच ते सहा वाजताच्या दरम्यान धाड टाकून चार आरोपींना ताब्यात घेतले असून 24हजार370 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई ठाणेदार अजय आखरे यांच्या मार्गदर्शनात हे. कॉ शिवाजी घुगे यांनी केली

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून मालखेड गावात ताज पत्ते जुगार रेड केली असता आरोपीच्या ताब्यातून ताश पत्ते व 24हजार370 रुपयांचा जुगार मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी राजेश प्रकाश चव्हाण (30). दीपक विष्णू चव्हाण (58) रामसिंग श्रावण राठोड (38) सर्व राहणार लालखेड व दिवाकर रामचंद्र वावरे (48)रा मालखेड या चार आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध कलम 12 (अ)मी.जु.का नुसार गुन्हा नोंद करण्यात आला सदरची कारवाई हेड कॉन्स्टेबल शिवाजी घुगे पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण मेश्राम पोलीस कॉन्स्टेबल रवी भुताडे व सागर पाचपोर यांनी केली

veer nayak

Google Ad