एस. ओ. एस. कब्स बुधवार बाजार रोड धामणगाव (रेल्वे) येथे पोळा सण उत्साहात साजरा.

0
5
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

श्री दत्ताजी मेघे बाल कल्याण शिक्षण संस्था द्वारा संचालित एस. ओ. एस.कब्स येथे पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . प्री प्रायमरी हेड मा. शबाना खान मॅडम आणि शिक्षिका वर्षा देशमुख मॅडम यांनी पोळा सणाविषयी माहिती सांगितली. पोळा हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहने साजरा केेला जातो या दिवशी बळीराजाची पुजा करतात बैल हा प्राणी शेतकऱ्याला कसा उपयोगी पडतो हे विद्यार्थ्याना समजावून सांगितले . शाळेच्या मुख्याध्यापिका प्रचिती धर्माधिकारी मॅडम आणि प्रि प्रायमरी हेड शबाना खान मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता प्रणिता जोशी ,रेणुका सबाने ,वर्षा देशमुख , आकाक्षा महल्ले, राणी रावेकर, प्राजक्ता दारुंदे श्रद्धा राय, अश्विनी नांदने यांनी सहकार्य केले.

veer nayak

Google Ad