विष प्राशन करून युवा शेतकऱ्याची आत्महत्या

0
96
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगांव रेल्वे

विष प्राशन करून युवा शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगरूळ दस्तगीर या गावी घडली आहे .नरेंद्र माणिकराव वसाके वय वर्षाचे 40 राहणार मंगरूळ दस्तगीर यांनी त्याच्या शेतामध्ये विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. सोमवारी दुपारी चार वाजता दरम्यान त्याने विष घेतले असता काही नागरिकांना कळतच त्यांनी ग्रामीण रुग्णालय धामणगांव रेल्वे येथे त्याला उपचाराकरिता आणले मात्र उपचारादरम्यान नरेंद्र याचा मृत्यू झाला. दत्तापूर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. घटनेचा पुढील तपास दत्तापूर पोलीस करीत आहे .दोन मुली, पत्नी ,भाऊ ,आई-वडील असा मोठा परिवार नरेंद्रच्या मागे आहे .नरेंद्रच्या मृत्यूने परिसरात दुःखाचे वातावरण पसरले आहे.

veer nayak

Google Ad