सुपरिचित शैक्षणिक संस्था पोदार इंटरनॅशनल स्कूल अमरावती नवनवीन उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी विभागामध्ये सुप्रसिद्ध आहे. याच उद्देशाने पोदार स्कूलच्या बहुप्रतिक्षित “पोदार उत्सव” वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मध्ये केले गेले. हे आयोजन पाठोपाठ पाच दिवसात नऊ इव्हेंट्स च्या माध्यमाने संपन्न झाले. ज्यामध्ये जिथे रामायण च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी उपस्तितांना भावविभोर केले, तिथेच छत्रपती शिवाजी महाराज नाटिकेने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. विद्यार्थ्यांद्वारा प्रस्तुत चंद्रयानची सुद्धा सगळ्यांनी भरपूर प्रशंसा केली. यासोबतच ‘अकबर बिरबल की नोक झोक’ च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी उपस्थितांना खूप हसविले. पोदार उत्सवामध्ये विद्यार्थ्यांद्वारे चतुरा चतुरा, अझीमो शान शहंशाह, पैसा बोलता है, सेलिब्रेशन डान्स, रॉयल दरबार डान्स, फय कून, हिंदी रिमिक्स, मराठी रिमिक्स इत्यादींवर नृत्य प्रस्तुतीकरण केले. पोदार उत्सवाच्या विविध क्षेत्रांमध्ये मुख्य अतिथी म्हणून जनरल मॅनेजर अमन टेमुर्डे, डॉ. वैशाली टेंभुर्डे, रूपाली दभाने, श्वेता मलिये, डॉ. श्रीकांत वढाळ, रवी वानखडे, डॉ. दीपा कडू, डॉ. राधिका देशमुख, प्रवीण सिंह ठाकुर , धीरज जवंजाळ, रुपेश टाले, प्रफुल्ल अनिलकर, अमर कराडे, प्रवीण माळवे, वृषाली वानखडे, उमेश इंगळे, श्री चंद्रकांत खेडकर, कृष्णा खंडेलवाल, धनंजय शीरसागर, किरण शर्मा , अतुल पाटील, रितेश राठी, उमेश आगलावे इत्यादी उपस्थित होते. या आयोजनावर शाळेचे प्राचार्य सुधीर महाजन यांनी सांगितले की, या वेळच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमाने शाळेद्वारे विद्यार्थ्यांसाठी अध्यात्म (रामायण) – इतिहास (छत्रपती शिवाजी महाराज) तसेच विज्ञान (चंद्रयान) यांचा त्रिवेणी संगम आयोजित केला गेला, ज्याचा उद्देश विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे होता. कार्यक्रमाच्या विविध क्षेत्रांमध्ये सूत्रसंचालन विशाखा सावरकर रेहा नानवाणी, अंशू पांडे, तुबा शेख, रोशनी लोणकर, विजेता वानखेडे, मुक्ता घुंडीयाल तसेच श्वेता ढवळे द्वारा केले गेले. कार्यक्रमाच्या सफलतार्थ प्राचार्य सुधीर महाजन यांच्या नेतृत्वामध्ये उपप्राचार्य अर्चना देशपांडे व मीनाक्षी मिश्रा, वरिष्ठ प्रशासकीय व्यवस्थापक भूषण पथे, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा दर्जी डॉ. आशिष खुळे, रोशनी दर्जी, डॉ. आशिष भेटाळू, सोनाली गवई, शक्ती स्वरूप गुप्ता, अपर्णा शेळके, प्रियंका देशमुख, प्रशांत शेळके, सविता लांजेवार, रुपेश भेले, वैभवी बोडे, प्रणव डांगे, प्रतीक जुमडे, वेदांती हीरुडकर, वैष्णवी राठोड, प्रद्युम्न बुदळकर तसेच पोदार फॅकल्टी द्वारे अथक परिश्रम केले गेले.
Home आपला विदर्भ अमरावती पोदार उत्सव ची शहरांमध्ये सर्वत्र चर्चा. पाच दिवसांमध्ये नऊ इव्हेंटचे आयोजन