भर पावसात पर्यावरण संवर्धन अभियान चे वतीने वृक्षारोपण!!

0
71
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अमरावती (गुलमोहर कॉलनी )दि :-०७जूलै २०२४ स्थानिक गुलमोहर कॉलनी रजनी मंगलम रेवसा रोड अमरावती येथे भर पावसात पर्यावरण संवर्धन अभियान चे वतीने वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हर्षदा घोम अहिल्याबाई बहुउद्देशिया संस्था च्या मध्यातुन.

वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला त्यानंतर आलेल्या उपस्थित नागरिक व विविध संघटन प्रतिनिधी व नागरिक, महिलांना वातावरणातील बदल व त्याचे दुष्परिणाम त्यावर उपाययोजना याबाबत प्रकाश मानेकर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते,हर्षदा घोम अहिल्याबाई बहुउद्देशिया संस्था,वर्षा तायडे, संगीता तोंडे (सामाजिक कार्यकर्त्यां) यांच्या प्रमुख उपस्थितीत,भारत कल्याणकर, संजय चोपडे, धर्मेंद्र भांडारकर, प्रफुल्ल कुकडे, गजानन तोंडे यांनी विचार मांडले व मार्गदर्शन केले. व गायत्री नर्सरी चे वतीने वृक्षाचे मोफत बीज वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास पर्यावरण संवर्धन अभियान मधील आम्ही भारतीय -जनसास्कृतिक चळवळ, क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन, सर्वज्ञ श्री. चक्रधर स्वामी सामाजिक विचार प्रबोधन अभियान, राष्ट्रसेवादल, अहिल्याबाई बहुउद्देशीय संस्था तसेच गजानन तोंडे, गौरव तोंडे, राज देशमुख, सोहम तोंडे, वर्षा तायडे आदी संघटन चे पदाधिकारी कार्यकर्ते व नगरातील नागरिक व महिला युवक यांची उपस्थिती होती.संचालन प्रफुल्ल कुकडे यांनी तर आभार संगीता तोंडे यांनी केले.

veer nayak

Google Ad