अमरावतीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची नियोजन आढावा बैठक संपन्न.. विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचे आयोजन

0
4
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अमरावती — विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या माध्यमातून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोज भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वात गेल्या १० वर्षांपासून विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी ऐतिहासिक संघर्ष सुरू असुन.मागील महायुतीच्या सरकारने विदर्भातील सरळ खरेदी धारक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच लाख रुपये या प्रमाणे १६६३३ हेक्टर क्षेत्रासाठी ८३२ कोटी रुपये सानुग्रह अनुदानास मंजूरी दिली होती तसेच महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्तांसाठी आर्थिक विकास महामंडळास सुध्दा मंजुरात दिली संघटनेच्या मागणी नुसार अमरावती विभागातील भूसंपादनाच्या प्रकरणांचा तीव्र गतीने निपटारा व्हावा यासाठी अमरावती येथे प्राधिकरणाची मागणी केली होती त्यानुसार सरकारने पावले उचलुन त्याची अंमलबजावणी करावी व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदानाची रक्कम लवकरात लवकर अदा करावी प्राधिकरणाचे कामकाज तातडीने सुरू करावे तसेच आर्थिक विकास महामंडळास निधी उपलब्ध करून देण्यात यावा यासाठी.

या बैठकीत सर्वानुमते चर्चा करण्यात आली असून. महाराष्ट्राच्या विकासासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या विदर्भातील प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र धारक सुशिक्षित बेरोजगारांच्या ५% समांतर आरक्षणात वाढ करुन ते १५% करण्यात यावे सरकारला प्रकल्पग्रस्तांना नौकरी देणें शक्य होत नसेल तर त्यांना आपले उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करण्यासाठी एकमुस्त ३० लक्ष रुपये विनाअट देण्यात यावे.तसेच ५८ वर्षांवरील प्रकल्पग्रस्तांना मिनिमम पेंशन योजना सुरू करावी अशा अनेक प्रकल्पग्रस्तांच्या हक्काच्या मागण्या व ईतरही महत्त्वाच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली असुन.चालु अधिवेशनात या संपूर्ण विषयांवर राज्याचे मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांना निवेदन देण्यासाठी संघटनेचे शिष्टमंडळ येत्या १८ व १९ तारखेला नागपूर येथे जाणार असल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोजभाऊ चव्हाण यांनी सांगितले. गरज पडल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा देखील संघटनेने दिला आहे. वऱ्हाडे मंगल कार्यालयात पार पडलेल्या बैठकीला विदर्भातील गोंदिया, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ,अकोला, अमरावती येथील संघटनेचे जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष शाखा प्रमुख प्रकल्प प्रमुख व शेकडो कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. यावेळी संघटनेचे पदाधिकारी अजय भोयर, संजय गीद.राजाभाऊ काळे प्रशांत मुरादे, गौतम खंडारे,प्रा.निलेश ठाकरे, नितीन मलमकार डॉ भगवान पंडीत, ठाकरे सर, भास्कर वानखडे, अरुण पाटील तायडे,शुभम डोनालकर, प्रमोद खाडे मनोज तंबाखे राजु लोणकर,संजय धोंडे, राजेश चौधरी, अश्र्विन होते,विजय डेहनकर विवेक डेहनकर रियाज पटेल,शरद खलोकार, नयन लुंगे प्रविण उमाळे राजु देठे, अमन भाई.अप्सर पठाण,रमेश भोयर, गणेश गावंडे, प्रशांत ठाकरे इत्यादी पदाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

आपला नम्र
मनोज एस.चव्हाण
संस्थापक अध्यक्ष विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटना विदर्भ प्रदेश.९९२१५०८८३७

veer nayak

Google Ad