आर के ज्ञान मंदिरम तर्फे शांतता रॅलीचे आयोजन महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य

0
14
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आर. के. ज्ञान मंदीरम इंग्लिश मिडीयम स्कुल नाचणगाव, पुलगावच्या वतीने महात्मा गांधीजी व लाल बहादूर शास्त्रीजी यांच्या जयंतीनिमित्त शांतता रॅली मोठ्या उत्साहात काढण्यात आली. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून आर. के. ट्रस्ट चे मुख्य समन्वयक श्री. नूरसिंग जाधव सर व उपमुख्याध्यापक श्री. गणेश इंगळे सर लाभले होते. या प्रसंगी शाळेचे प्राचार्य नितीन श्रीवास, पर्यवेक्षिका प्रीती बिडकर व प्रणिता कोंबे, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे प्राचार्य नितीन श्रीवास यांच्या हस्ते महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. प्राचार्य नितीन श्रीवास यांनी महात्मा गांधीजी आणि लाल बहादूर शास्रीजी यांच्या जीवन कार्याविषयी आपले विचार मांडले. या प्रसंगी काही विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री व भारत माता यांची वेषभूषा साकारली होती. या प्रसंगी शांतता रॅलीचे आयोजन आर.के. ज्ञान मंदिरम परिसर ते गांधी बाल उद्यान पर्यंत करण्यात आले होते. शाळेचे प्राचार्य नितीन श्रीवास यांनी गांधी बाल उद्यान येथील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला हारार्पण करून आदरांजली वाहिली व थोडक्यात महात्मा गांधीजी बद्दल आपले विचार व्यक्त केले. या प्रसंगी गांधी बाल उद्यान चे व्यवथापक जमीलभाई यांनी देखील महात्मा गांधीजीबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणित शिक्षिका प्रथा तिवारी यांनी केले तर आभार हिंदी शिक्षिका मनीषा मिश्रा यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे प्राचार्य नितीन श्रीवास यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन समिती, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस स्टेशन, पुलगाव व गांधी बाल उद्यान यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

veer nayak

Google Ad