नवथळ खुर्द येथील पाणीप्रश्न पेटला.समस्त ग्रामस्थांची नितीन कदम यांच्या नेतृत्वात मजीप्राला दिले निवेदन. नितीन कदम यांच्या कार्यातत्परतेमुळे मजीप्राने दाखविला हिरवा कंदील

0
24
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

प्रतिनीधी/अमरावती

भातकुली तालुक्याअंतर्गत हरतोटी ग्रामपंचयातीमधील नवथळ खुर्द येथील पिण्याच्या पाण्याची गैरसोय व व जल जीवन योजनेच्या पाण्याच्या टाकीअभावी संतप्त ग्रामस्थांनी नितीन कदम यांच्या नेतृत्वात उपअभियंता , मजीप्रा उपविभाग यांना निवेदन देण्यात आले.यावेळी मजीप्रा विभागाने संतप्त ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन तत्काळ जल जीवन योजनेच्या टाकीचे समंती परिपत्रक काढून हिरवा कंदील दिला.

दरम्यान ग्रामस्थांनी नितीन कदम यांचे आभार मानले. भातकुली ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याची गैरसोय थांबता थांबत नाहीये ..! उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वाढत्या तापमानामुळे परिस्थिति आणखीच बिकट होते. अशातच हरतोटी ग्रामपंचयातीच्या नवथळ खुर्द येथील ग्रामस्थांना जल जीवन मिशन अद्यापही लाभ मिळाला नसून पाण्याच्या टाकीअभावी पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागते.गेल्या आठवड्यात नितीन कदम यांनी आसरा गावानजीकच्या बंधाऱ्याचा यशस्वी पाठपुरावा करत कामाची पाहणी केली.ग्रामीण भागातील पांदण रास्ते असो वा शेतकऱ्यांचे विविवध समस्या नितीन कदम ही नेहमीच अग्रेसर राहतात .

अश्यातच नवथळ येथील ग्रामस्थांची अनेक वर्षापासूनची टाकीची मांगणीसंदर्भात नितीन कदम यांनी दाखल घेत समस्थ नागारिकांसोबत मजीप्राचे कार्यालय गाठले. जल जीवन मिशनअंतर्गत पाण्याच्या टाकीचे बांधकाम करून पाण्याच्या व्यवस्थेकरिता शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. मजीप्राचे उपअभियंता व अन्य अधिकाऱ्यांनी नितीन कदम यांच्या कार्यतत्परतेला बघता २५ हजार लीटर पाण्याच्या उंच टाकीच्या बांधकामकरिता जलदगतीने कामाचे समंती पत्रक जाहीर करत हिरवा कंदील दिला . यावेळी संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम,स्वप्नील मालधुरे,अभिषेक सवाई,गोवर्धन गुडधे,सुरेश धडगे,संदीप धडगे,एकनाथ धडगे,बापूराव धडगे,सुरेश धडगे,गौरव धडगे,गौरव धडगे,संदीप धडगे,आशिष धडगे,नारायण धडगे,सुधाकर चहाकर,स्वराज धाडगे ,गजानन धाडगे ,विनोद भगत,दिलीप ढोके,सुनील धडगे,नागोराव धडगे,रामकृष्ण धडगे,संकेत धडगे,गजानन धडगे,प्रवीण धडगे,चेतन धडगे,भारती घोंगडे,नंदाताई धडगे,अनंत धडगे,वृशाली धडगे,रेखाताई धाडगे,मीनल धाडगे,चंदाताई धाडगे,आरती धाडगे,प्रमिला धाडगे,निर्माला धाडगे व इतर नागरिक उपस्थित होते.

veer nayak

Google Ad