पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न

0
4
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अमरावती, दि. 23 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा (प्लेसमेंट ड्राईव्ह -02) नुकताच अमरावती येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात 210 उमेदवारांनी सहभाग नोंदविला.

या मेळाव्यात जाधव गेअर्स प्रा. लि., सत्या मायक्रो कॅपिटल लि., ई. सी. ई. इंडिया प्रा.लि, दामोदर इंडस्ट्रीस प्रा. लि., डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय, श्री. शिवाजी बहुउद्येशीय महाविद्यालय, विदर्भ आयुर्वेदीक महाविद्यालय, जिनस इंन्फ्रास्ट्रक्चर लि. इत्यादी खाजगी आस्थापनेच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला.

या मेळाव्यात 172 उमेदवारांनी मुलाखती दिल्या आणि त्यापैकी 82 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. मेळाव्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र येथील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

veer nayak

Google Ad