तिवसा विधानसभेत शिवसेना उबाठा ला खिंडार
प्रतिनिधी/प्रविण पाचघरे. तिवसा मतदार संघातिल तथा मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई तेथील शिवसेना ऊबाठा पक्षाच्या महिला आघाडी तालुकाध्यक्ष प्रणिता नवले , अमोल नवले शिवसेना सर्कल प्रमुख उबाठा, नेरपिंगळाई, दत्तराज इंगळे शिवसेना उबाठा सर्कल प्रमुख राजुरवाडी, सुरज कुरसंगे शिवसेना उबाठा ग्रामपंचायत सदस्य नेरपिंगळाई, नरेंद्र खेडकर बुथ प्रमुख शिवसेना उबाठा, राजेंद्र गायकी बुथ प्रमुख शिवसेना उबाठा, प्रमोद घाटे शिवसेना बुथ प्रमुख उबाठा तथा सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांच्या सह असंख्य कार्यकर्त्यांनी व मोर्शी तालुक्यातील शेकडो पदाधिकारी व
शिवसैनिक उबाठा यांनी भारतीय जनता पार्टी चे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री अमरावती चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत व आमदार राजेश वानखडे तिवसा विधानसभा मतदारसंघ यांच्या नेतृत्वात दिनांक ३१/१२०२५ शुक्रवारी अमरावती येथील शासकीय विश्रामगृह येथे जाहिर पक्षप्रवेश केला त्यामुळे नेरपिंगळाई मोर्शी तालुक्यातील तिवसा विधानसभा मतदार संघात शिवसेना उबाठा पक्षाला मोठ्या प्रमाणावर खिंडार पडले