श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित स्थानिक जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयात रसायनशास्त्र मंडळाच्या अंतर्गत आर. डी. आय. के. आणि के. डी. महाविद्यालय बडनेरा येथील प्रा. संचीता पिंपळे यांच्या गेस्ट लेक्चरचे आयोजन करण्यात आले. प्रा. पिंपळे यांनी ‘काँटम मेकॅनिक्स’ या विषयावर विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांना येणाऱ्या विषयातील अडचणी सोडवून सांगितल्या.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता प्राचार्य डॉ. अतुल के बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनशास्त्र विभागातील प्रा. डॉ. अनिल सोमवंशी, प्रा. राहुल सावरकर, प्रा. डॉ. अपर्णा दिघडे, प्रा. शुभांगी सोनाने, प्रा. डॉ. देवल देशमुख, प्रा. अंकिता भेलकर, प्रा. गायत्री हरणे यांनी परिश्रम घेतले. ह्या लेक्चर करिता पदव्युत्तर रसायनशास्त्र विभागाचे चे सर्व विद्यार्थी उपस्थीत होते व विद्यार्थ्यांनी ह्या मार्गदर्शनाबद्दल प्रा. पिंपळे यांचे व आयोजनाबाबत महाविद्यालयाचे आभार मानले