धामणगाव रेल्वे
मा. श्री दत्ताजी मेघे बाल कल्याण शिक्षण संस्था द्वारा संचालित स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये जागतिक अवयव दान दिवसाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून नामांकित बालरोगतज्ञ डॉ.अमित गुल्हाने उपस्थित होते. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
प्रमुख अतिथींनी अवयव दाना विषयी माहिती विद्यार्थांना दिली आणि अवयव दानाचे महत्त्व सांगितले.
या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या प्राचार्या प्रचिती धर्माधिकारी व येलो हाऊस सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इंग्रजी शिक्षिका स्नेहल राजपूत
व आभार प्रदर्शन गणित शिक्षिका दिप्ती चौबे यांनी केले. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आणि कार्यक्रम यशस्वी केला.