दर्यापूर – श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित स्थानिक जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयात महाविद्यालयाच्या ‘इनक्युबेशन अँड इनोव्हेशन सेल’ च्या वतीने व आय क्यू ए सी व केमिकल सोसायटी च्या सहकार्याने ‘इनोव्हेशन अँड स्टार्टअप’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल के. बोडखे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक व महाविद्यालयाचे आय क्यू ए सी कॉर्डिनेटर प्रा. मनीष होले व इनक्युबॅशन अँड इनोव्हेशन सेल चे समन्वयक प्रा. डॉ. देवल देशमुख उपस्थित होते. कार्यशाळेस प्रा. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, बडनेरा येथे कार्यरत प्रा. डॉ. प्रतीक देशमुख हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले. सदर कार्यशाळेच्या उद्घाटनानंतर प्रा. प्रतीक देशमुख यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत स्टार्ट अप ही संकल्पना भारतात स्थापित झालेल्या उद्योगांच्या उदाहरणांसहित स्पष्ट करण्यात आली. त्याचप्रमाणे स्टार्टअप चा भारतीय अर्थव्यवस्थेवर कसा सकारात्मक परिणाम होतो हे सुद्धा समजावून सांगण्यात आले. तसेच या क्षेत्रात केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांविषयी माहिती अवगत करून दिली. नोकरी शोधण्यापेक्षा नोकरी तयार करणारे बना असे प्रतिपादन प्रा. देशमुख यांनी केले. या कार्यशाळेचा लाभ महाविद्यालयाच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या पदवी तसेच पदव्युत्तर विभागाच्या विद्यार्थ्यांनी घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अंकिता अडोकार यांनी व आभार प्रदर्शन गौरव बोरखडे यांनी केले. या कार्यशाळेच्या यशस्वीते करिता प्राचार्य डॉ. अतुल बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अनिल सोमवंशी, प्रा. राहुल सावरकर, डॉ. देवल देशमुख, डॉ. अपर्णा दिघडे, प्रा. शुभांगी सोनोने, प्रा. अंकिता अडोकार व रसायनशास्त्र पदव्युत्तर विभागाच्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.