तालुका प्रतिनिधी/
धामणगाव तालुक्यातील सुप्रसिद्ध व शिक्षणाच्या बाबतीत आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी धामणगाव एज्युकेशन सोसायटीची एक भाग म्हणून श्री धापुदेवी भट्टड इंग्लिश मीडियम प्री प्रायमरी स्कूल धामणगाव रेल्वे येथे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून दिनांक 13 /8 /2014 रोजी प्री प्रायमरी स्कूल मध्ये K. G ll लोटस व मेरीगोल्ड मुला मुलींचे lndependence day speech activity on my Favourite Leader या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये k. G ll च्या मेरीगोल्ड व लोटस या विभागातील मुला व मुलींनी स्वातंत्र्यदिनानिमित्त वेगवेगळ्या प्रकारच्या आणि अतिशय सुंदर अशी आपली स्पीच तयार करून मांडली आहे. 14 /8/ 2024 रोजी Tri
colour food activity (Nursery.. K G l… K G ll ) flag colouring k G l या कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन केलेले आहे.अशा या कार्यक्रमामुळे श्री धापुदेवी भट्टड इंग्लिश मीडियम प्री प्रायमरी स्कूल मधील संपूर्ण वातावरण हे तिरंगा मय झालेले होते. या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शाळेतील व्यवस्थापक व शिक्षक व इतर कर्मचारी यांनी आपल्या प्रयत्नांनी हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला आहे.