(धामणगाव रेल्वे प्रतिनिधी)
डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला सलग्नित व श्री संत शंकर महाराज आश्रम द्वारा संचालित श्री. संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय पिंपळखुटा येथे नुकतेच सन्माननीय अधिष्ठाता (कृषी) तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांचे निर्देशानुसार “फिट इंडिया सप्ताह” विविध उपक्रमांद्वारे संपन्न झाला.
यावेळी महाविद्यालयाचे क्रीडा अधिकारी प्रा. अनिल चव्हाण यांचे प्रमुख सहकाऱ्यांनी विविध उपक्रमांचे “फिट इंडिया सप्ताह” मध्ये आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध कर्मचाऱ्यांचे नियोजनामध्ये महाविद्यालयात श्री अंकुश ठाकरे व सौ मनीषा ठाकरे ए. आर. टी. फिटनेस क्लब धामणगाव रेल्वे यांचे उपस्थितीत योगा, प्राणायाम, झुंबा डान्स, कार्यशाळा घेण्यात आली. यानंतर सात दिवस नींबू चमचा स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, निबंध स्पर्धा, व्यायाम शाळा प्रशिक्षण, इत्यादी उपक्रम घेण्यात आले. यामध्ये महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक व कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी प्राचार्य वृषाली देशमुख यांनी विद्यार्थ्यांना सकस आहार व फळांचे सेवन करून रोजच्या दैनंदिन कार्य मधून थोडा वेळ काढून प्राणायाम व इतर व्यायाम करून आपले आरोग्य सुदृढ ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी सर्व उपस्थिताना फिट इंडिया बाबत प्रतिज्ञा देण्यात आली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा दीपक बोंद्रे यांनी “फिट इंडिया सप्ताह” वगळता वर्षभर आपले उत्तम आरोग्यासाठी सर्वांनी प्राणायाम, योगाभ्यास, सायकलिंग, नियमीत दोन किलोमीटर पैदल प्रवास मर्यादित जिम व घरगुती व्यायाम, सातत्याने करण्याचे आवाहन केले. फिट इंडिया सप्ताहाचे यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष नंदूशेठ चव्हाण महाविद्यालय पदाधिकारी राजूभाऊ भोगे, एडवोकेट प्रकाशराव देशमुख, श्री महादेवराव शिवनकर, प्राचार्य वृषाली देशमुख, प्रा मनीषा लांडे, प्रा.अनिल चव्हाण, प्रा कल्याणी जाधव ,प्रा निकिता राऊत, प्रा पि.डी राऊत ,प्रा.राजेश इंगोले,प्रा.दीक्षा मौजे, प्रा निलेश शेळके,प्रा. वैष्णवी बिजने, श्री. सुहास आप्तूरकर व सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक यांचे अमूल्य सहकार्य लाभले.