आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : दिनांक 26 नोव्हेंबर संविधान दिवसाच्या निमित्ताने कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आर्वी येथे 26 नोव्हेंबर 2025 संविधान दिवसाचे अमृत वर्ष साजरे करण्यात आले या प्रसंगी सुजान नागरिक मंच यांच्या सहकार्याने ” राज्यस्तरीय संविधान गुण गौरव परीक्षा 2025 ” घेण्यात आली. या परिक्षेच्या केंद्रप्रमुख प्रा डॉ विजया मुळे संचालिका

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले निःशुल्क मुलींची अभ्यासिका वसंत नगर ,आर्वी , परीक्षेचे स्थळ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आर्वी . परीक्षेच्या सुरुवातीला अभ्यासिकेतील मुलींच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच महाविद्यालयातील प्राचार्य डॉ रवींद्र सोनटक्के साहेब यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करुण अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक प्रा. डॉ अनिल दहाट सरांनि केले , प्रा. डॉ मस्के सर यांनी विद्यार्थ्यानच्या व महाविद्यालयातील कर्मचारी यांच्या उपस्थितीत संविधानाच्या प्रास्ताविकेच वाचन करण्यात आले, या परीक्षेत विद्यार्थ्यांचा भरपूर सहयोग लाभला तसेच या संविधानाच्या परिक्षेकरिता आदरणीय अनिल खैरकर सर, आद. नरेंद्र पखाले सर, आद. भीमरावजी मनवर साहेब, प्रा. डॉ अनुप गुंमळे सर , प्रा. डॉ अनिल दहाट सर या सर्वांनी भरपूर सहकार्य केले त्याबद्दल मी या सर्वांचे आभार मानते . परीक्षेचा वेळ दुपारी 1ते 2 होता. या पद्धतीने संविधान विषयी विद्यार्थ्यान मध्ये जागृती निर्माण व्हावी या अनुषंगाने या परीक्षेचे आयोजन करण्यात आले.
















