आर्वी, प्रतिनिधी /पंकज गोडबोले
आर्वी : जागृती स्टुडंट्स अकॅडमी, साई नगर, आर्वी येथे दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संवाद कौशल्ये व व्यासपीठावर बोलण्याची हिंमत विकसित करण्याच्या उद्देशाने एकूण ६० विद्यार्थ्यांच्या सहभागासह भाषण स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला श्री. प्रदीप मोकद्दम सर, श्री. प्रफुल क्षीरसागर सर, श्री. प्रमोद नागरे सर आणि सौ. शारदा मून मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांनी आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
ही स्पर्धा तीन गटांमध्ये घेण्यात आली.
गट अ (इयत्ता १ ली ते ५ वी) मध्ये
प्रथम क्रमांक – अनया मनोज बोडखे,
द्वितीय क्रमांक – रुही प्रविण चोरे,
तृतीय क्रमांक – श्रुती संतोष गहलोटकर यांनी पटकावला.
प्रोत्साहन पुरस्कार विभागात
प्रथम – तनिष्का पंकज वानखेडे,
द्वितीय – तीर्था राहुल वडतकर यांना सन्मानित करण्यात आले.
गट ब (इयत्ता ६ वी ते ९ वी) मध्ये
प्रथम – नैतिक विशाल पोकळे,
द्वितीय – धनश्री सुधीर सोलंके,
तृतीय – मोहम्मद साद यांनी यश संपादन केले.
गट क मध्ये
प्रथम – प्रगती आठवले,
द्वितीय – लौकेश पवार,
तृतीय – प्रतीक अंजनगावकर यांनी बक्षिसे मिळवली.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन रुतुजा प्रधान यांनी केले. प्रास्ताविक साक्षी प्रधान यांनी मांडले, तर आभार प्रदर्शन करण आठवले यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजकांनी परीक्षक, पालक व सहभागी सर्व ६० विद्यार्थ्यांचे आभार मानले.
जागृती स्टुडंट्स अकॅडमीचे संस्थापक श्री. रजत रामटेके यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत आजच्या काळात सार्वजनिक भाषण कौशल्याचे महत्त्व अधोरेखित केले.














