चांदूर रेल्वे तालुका प्रतिनिधी
भक्ती शक्ती संगम सोहळा श्री संत गजानन महाराज सेवा समिती चांदूर रेल्वे च्या वतीने चांदुर रेल्वे तालुका प्रथमच
कु शुभदाताई मेटकर (बी.ई)मुखोद्रत यांच्या मधुर वाणीतून स्थानीय संताबाई यादव मंगलकार्यालयात शनिवार १० फेब्रुवारी सकाळी ८ वाजता पासुन एक दिवसीय श्री संत गजानन महाराज विजय ग्रंथ पारायणाला सुरूवात होणार असल्याचे आयोजन समितीचे सांगीतले आहे.
विदर्भसह संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे आराध्यदैवत श्री संत गजानन महाराजाच्या विजय ग्रंथाचे एक दिवसीय पारायण चांदूर रेल्वे शहरात आयोजित करण्यात आले असून या मध्ये संत गजानन महाराजांचे ११०० भक्त सकाळी ८ वाजता पासुन श्रीच्या विजय ग्रंथाचे पारायण करणार असून या सोहळ्यात हजारो भक्त सहभागी होणार आहे श्रीचे पारायण झाल्यानंतर लगेच श्रीची महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून या करीता शहरातील व तालुक्यातील अनेक भक्त सहकार्य करत असल्याचे आयोजन समितीने सांगितले आहे.ज्या भक्तांना पारायण किंवा सेवा घ्यायची असेल त्यांनी आयोजक समिती ह.भ.प. अक्षय महाराज हरणे,ह.भ.प. राजेन्द्र महाराज मस्के,अभिजित तिवारी,महेश देशपांडे, नितीन गोखले, हेमंत उंमरतकर, शैलेंद्र मेटे, निशिकांत देशमुख, स्वातीताई मेटे याच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे