कावली वसाड
डॉ.बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियान अंतर्गत पाच दिवसीय सामनेर व अनागारीका प्रशिक्षण शिबिराचे आयोजन अंजनसिंगी येथील लुंबिनी बौद्ध विहार येथे 22 मे ते 26 मे निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराचे उद्घाटक प्रवीण भाऊ हेंडवे कार्यक्रमाचे अध्यक्ष गजानन भाऊ भेंडे सामाजिक कार्यकर्ता तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अनुप वाकडे पोलीस उपनिरीक्षक कुर्रा, गौतम इंगळे पोलीस उपनिरीक्षक मंगरूळ दस्तगीर, जगदीश शिंदे नागपूर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
सदर पाच दिवसीय धम्म प्रशिक्षणामध्ये विविध मार्गदर्शन यामध्ये करण्यात येणार आहे.
या शिबिरासाठी प्रशिक्षक भन्ते धम्मतिस्स औरंगाबाद, यांच्या हस्ते सामनेर धम्मदीक्षा विधी करण्यात येईल भंते राहुलस्तवीर, भन्ते धम्मसेन अमरावती, पूज्य भन्ते चंद्रमणी ग्वालियर, हे उपस्थित प्रशिक्षणांना योग्य ते प्रशिक्षण मार्गदर्शन करणार आहे पाच दिवसीय धम्म शिबिरामध्ये ध्यान साधना, आर्य अष्टांगिक मार्ग,सिगारसुक्त, पाली भाषा म्हणजे काय, पंचशील म्हणजे काय, स्पर्धा परीक्षात्मक मार्गदर्शन विविध जादूगर प्रयोग तसेच बौद्ध धम्मा संबंधी विविध आचरण विचार यासंबंधीचे मार्गदर्शन केले जाणार आहे. या शिबिरामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आंबेडकरी विचारवंत साहित्य चेतन चव्हाण,गुलाब मेश्राम, माणिक वानखडे,सुनील शिंदे, उज्वल हेडवे, गजानन मोहोळ, निशांत दहाड, मीनाक्षीताई मनोहरे, पद्माकर वहिले अशा विविध मान्यवरांचे सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन केले जाईल. श्रामनेर शिबिराचे आयोजन हे अमरावती जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे आतापर्यंत अभियानाने नागपूर यवतमाळ वर्धा अमरावती यासारखे शहरांमध्ये घेतली असले तरी आता ग्रामीण भागातील अंजनसिंगी सारख्या गावात घेतले असल्याने या शिबिरामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी भाग घेण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष बंडूभाऊ आठवले,पपीता ताई मनोहरे,गजानन गवई,ज्योतीताई मेश्राम, नितीन टाले,सुरेंद्र मनोहर, मृदुलताताई हिरोडे, राजाभाऊ मनोहरे, सुनिता ताई पोहेकर, मनोरमा वहिले,अरुणाताई आठवले,इंद्रपाल रंगारी,प्रतिभा डोंगरे, तसेच ग्रामीण भागातील महिला मंडळ व तरुण उत्साही मंडळांनी आवाहन केले आहे.