पिंपळोद :- विश्वस्त मंडळ व समस्त गावकरी मंडळी पिंपळोद च्या वतीने संत परमहंस परशराम महाराज यांचा ७३ वा पुण्यतिथी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवानिमित्त
आय टी आय (परिसर) परशराम नगर, पिंपळोद ता. दर्यापूर जि.अमरावती येथे २४ मार्चपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दि.२४ मार्च २०२४ रोजी सकाळी ठीक ८ वाजता तीर्थ स्थापना तर सायं. ६ वाजता होम पूजा होईल.
सोमवार दि. २५ मार्च २०२४ रोजी सकाळी १० वाजता श्री ची मिरवणूक निघेल दुपारी २ वाजता ह.भ.प. श्री. प्रशांत महाराज ताकोते (शिरसोली) यांचे काल्याचे किर्तन होईल व त्या नंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
पंचक्रोशीतील सर्व भावीक भक्तांनी श्री च्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आयोजकांनी कळविले आहे.