प्रा. नितीन वानखेडे सेवानिवृत्त झाल्याबद्दल मॉडेल हायस्कूल, कनिष्ठ महाविद्याल व किमान कौशल्यावर आधारित व्यवसाय अभ्यासक्रम ( M. C. V. C) द्वारे निरोप व सत्कार

0
41
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी :- प्रा. नितीन वानखेडे यांनी शालेय परिसरामध्ये वृक्ष लागवड व वृक्षांचे संवर्धन करून परिसर हिरवागार केला व आपले कार्य उत्कृष्टरित्या पार पाडले असे प्रतिपादन भारत शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष अॅड. शोभाताई काळे यांनी मॉडेल कनिष्ठ महाविद्यालयातील हार्टिकल्चर विभागाचे प्रा नितीन वानखेडे सेवानिवृत्त झाल्याबद्दल मॉडेल हायस्कूल, कनिष्ठ महाविद्याल व किमान कौशल्यावर आधारित व्यवसाय अभ्यासक्रम ( M. C. V. C) याद्वारे निरोप व सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात केले 

 कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य प्रवीण पावडे तर प्रमुख अतिथी माजी प्राचार्य प्रा. अभय दर्भे, सत्कारमूर्ती प्रा नितीन वानखेडे,वर्षा वानखेडे यांची उपस्थिती होती.

 उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नितीन वानखेडे यांचा संपत्नीक शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. नितीन वानखेडे यांनी 32 वर्षाच्या सेवाकाळात आलेले विविध अनुभव सांगून संस्था,आजी-माजी सहकारी या सर्वांचे आभार मानले 

माजी प्राचार्य अभय दर्भे यांनी सत्कारमूर्तींच्या विद्यार्थ्याप्रती असलेले प्रेम आपुलकी व जिव्हाळा संबंधी आलेले अनुभव सांगितले.

 प्रभारी प्राचार्य प्रवीण पावडे यांनी शालेय परिसर व शाळेबद्दल असलेल्या आपुलकीमुळे विद्यार्थ्यांना शिकविणे व इतर कामाच्या बाबतीतही ते नेहमी कार्यरत होते असे सांगितले

 प्रा सुरेंद्र मेघे, विजय जहकर सौ वैशाली उमेकर, सचिन वानखेडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रा संजय बुले,प्रा वासुदेव गोंदाणे,प्रा सुनिल इंगोले ,प्रा संजय इंगोले, राजाभाऊ वानखेडे, निशांत वानखेडे, सचिन वानखेडे, 

जया राजेश वानखेडे, रवींद्र बाबाराव रानोटकर, विजया रवींद्र रानोटकर ,श्वेता सचिन वानखेडे, कुटुंबीय उपस्थित होते. प्रास्ताविक भास्कर गौळकर यांनी तर संचालन चवरे मॅडम तर आभार चारभे मॅडम यांनी मानले.

 कार्यक्रम यशस्वी करण्याकरता मॉडेल हायस्कूल,कनिष्ठ महाविद्यालय व एमसीवीसी च्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

veer nayak

Google Ad