चिऊताईचा चिवचिवाट
पुन्हा पुन्हा जागृत करूया,
पर्यावरण रक्षणाचा ध्यास
अधिक भक्कम करूया..
आज दिनांक- 20 मार्च “जागतिक चिमणी दिन”… चिमणी तसेच इतर सामान्य पक्षी यांना शहरी वातावरण असलेल्या धोक्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिन महत्वाचा..आपण सर्वांचे बालपण सुखमय करणारी “चिऊताई” केवळ गोष्टींपुरती मर्यादित राहू नये या करिता कटीबद्ध होऊया..!
“उन्हाळ्यात”
मूठभर दाणे, अनं
वाटीभर पाणी
पक्ष्यांकरिता नक्की ठेऊ या..
हाच सामाजिक संदेश धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित से.फ.ला.हायस्कूल,धामणगाव- रेल्वे जिल्हा -अमरावतीचे कला शिक्षक -चित्रकार अजय जिरापुरे यांनी विदयालयाच्या दर्शनी फालकावर “चिऊताई”चे चित्र रेखाटन करून दिला आहे.