आमच्या आणलेल्या प्रत्येक योजनांना कोर्टात आव्हान करण्याचे काम काँग्रेस व महाविकास आघाडी सरकारने केले आहे परंतु लाडक्या बहिणीची योजना असो, शेतकऱ्यांच्या योजना असोत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण असो त्या प्रत्येक योजनेला आम्ही लागू करून घेतल्याच आणि एकीकडे काँग्रेस व महाविकास आघाडी सरकार आमच्या विकासात्मक योजनांना न्यायालयात आव्हान देत असल्यामुळे त्यांना मत मागण्याचा अधिकारच नाही असे सडेतोड भाषण राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी धामणगाव येथे केले फडणवीस यांचे आगमन होताच उपस्थित हजारो लाडक्या बहिणी आणि कार्यकर्त्यांनी देवा भाऊ देवा भाऊ अशा आकाशभेदी घोषणा दिल्यात “मै जो बोलता हूँ वही करता हु कमेंट करने के बाद खुद की भी नही सुनता”हे डायलॉग फडणवीस यांनी म्हणताच प्रचंड गर्दी असलेल्या नागरिकांमध्ये जल्लोष निर्माण झाला
आमदार प्रताप अडसड यांच्या प्रचारार्थ रविवारी देवेंद्र फडणवीस यांची प्रचंड सभा मिश्रिकोटकर मैदानावर झाली यावेळी भावनिक आव्हान करून आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते अरुणभाऊ अडसड यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ते या सभेत उपस्थित होऊ शकले नाहीत अरुणभाऊंची भूमिका आपल्या सर्वांना निभावयाची आहे असे आवाहन केले धामणगाव मतदार संघाचा संपूर्ण विदर्भात रेकॉर्ड ब्रेक विकास झाल्याचे फडणवीस म्हणाले प्रतापदादांनी शेतकऱ्यांकरिता पांदण रस्ते धामक पाथरगाव येथील प्रकल्प मंजुरी संपूर्ण मतदारसंघांमध्ये सिमेंट रोड रस्ते नाल्या कोट्यावधीची पाणीपुरवठा योजना तसेच सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे १७ तीर्थक्षेत्रांना प्रत्येकी पाच पाच कोटी रुपये मंजूर करून घेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सुद्धा केले आहे प्रताप अडसड यांच्या मागणीनुसार पांदण रस्त्याचे डांबरीकरण सुद्धा आमचे सरकार येताच करून देण्यात येईल असे फडणवीस म्हणाले ते म्हणाले की आमचे सरकार येताच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आम्ही देणार आहोत तसेच ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री केली त्यांना भावांतर योजनेअंतर्गत रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येईल जर सोयाबीन खरेदी करिता धामणगाव मतदार संघातील तीनही कृषी उत्पन्न बाजार समितीने शासकीय खरेदी प्रारंभ केली असती तर शेतकऱ्यांना लाभ मिळाला असता परंतु इथले माजी आमदार जगताप यांच्या हातात असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हेतू पुरस्कार खरेदी सुरू न केल्यामुळे शेतकऱ्यांना भावापासून वंचित राहावे लागत आहे आम्ही हमी पेक्षा कमी भाव देणार नाहीत शेतकऱ्यांना बारा तास सकाळी आणि रात्री सुद्धा मागणीनुसार विद्युत पुरवठा करण्यात येईल पुन्हा आमचे सरकार येताच लाडक्या बहिणींना आता १५०० नव्हे तर २१०० रुपये मिळेल याव्यतिरिक्त येणाऱ्या पाच वर्षात म्हणजेच 2018 पर्यंत 11 लाख वरून राज्यात एक कोटी लखपती दिदी करण्याचे आमचे लक्ष आहे अशी गॅरंटी त्यांनी यावेळी दिली या मतदारसंघांमध्ये विपश्यना केंद्र प्रताप अडसड यांच्या मागणी केल्यानुसार मंजूर करतो असेही ते म्हणाले आपण सर्वांनी माझा लहान भाऊ प्रताप अडसड याला निवडून आणावे संपूर्ण विकासाची गॅरंटी सुद्धा मी घेतो असे फडणवीस म्हणाले विदर्भातील साडे पाचशे किलोमीटर वैनगंगा नदीच्या माध्यमाने दहा लाख एकर जमीन ओलित खाली करण्याची आमची योजना असून या योजनेनुसार कायम दुष्काळ संपणार आहे।
यावेळी व्यासपीठावर आमदार प्रताप अडसड, माजी खासदार नवनीत राणा,सुरेश वाघमारे,जनार्धन रोठे,संतोष महात्मे,हरीशचंद्र खंडाळकर,बबनराव गावंडे निकेत ठाकरे,रवींद्र मुंदे, घनशाम सारडा बंडू भुते,मनोज डहाके, मोहन गावंडे,उषा तिनखेडे,नलिनी मेश्राम,रामदास निस्ताने,प्रशांत मून,पुरुषोत्तम बनसोड दुर्गाबक्षसिंग ठाकूर,विलास बुटले,अर्चना तिखले,सुरेखाताई शिंदे,,राकेश पाठक, रणजीत पाटेकर,मनोज चव्हाण, रुपाली नाकाडे, मोनाली बाबुळकर, सविता ठाकरे, कय्युम भाई, जावेद भाई, योगश अंभोरे, गिरीश भूतडा, पवन पडोळे, निवृत्ती लोखंडे, प्रफुल मानके,योगेश झिमटे,रोशन खेरडे,अंकित कदम,अखीलेश पोळ,किरण निस्ताने, नंदा माने, श्रीराम पत्रे व आदी उपस्थित होते. याप्रसंगी माजी खासदार नवनीत राणा यांच्या भाषणाने उपस्थिततांमध्ये संचार पाहावयास मिळाला त्या म्हणाल्या काँग्रेसचा राजकुमार संविधान हातात घेऊन आमच्या बंधू- भगिनींसोबत खोटे बोलतो आहे वास्तविक संविधान आमच्याकरिता श्रद्धास्थान आहे त्या म्हणाल्या प्रताप अडसड यांनी न भूतो अशी विकासात्मक कामे धामणगाव मतदार संघात केलेली आहेत यावेळी प्रताप अडसड यांनी आपल्या भाषणातून राज्य शासनाकडून आणलेल्या कोट्यावधी निधीने करण्यात आलेल्या विकासाच्या पाडा उपस्थितांसमोर मांडला ते म्हणाले काँग्रेस व महाविकास आघाडीने संविधानाचा खोटा प्रचार केला वास्तविक जिवंत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसने कधीच सहकार्य केले नाही उलट मृत्यूनंतरही डॉक्टर आंबेडकर यांच्या पार्थिवा करिता जागा सुद्धा तत्कालीन पंतप्रधान नेहरूंनी नाकारली होती आणि आज हीच काँग्रेस संविधाना वर खोटे आरोप करीत आहे ते म्हणाले की विदर्भात भरपूर निधी आपल्या मतदारसंघाला फडणवीस यांच्या सहकार्याने आपल्याला मिळाला या निधीने आपण शेतकरी शेतमजूर विद्यार्थी यांच्यासोबतच मतदार संघात प्रचंड विकास घडवून आणला कार्यक्रमाच्या वेळी मंचावर महायुती आघाडीचे सर्वच नेतेमंडळी उपस्थित होती संचालन रामदास निस्ताने यांनी तर आभार मनोज डहाके यांनी व्यक्त केले.